UGC Descision Saam Tv
देश विदेश

UGC: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! विद्यापीठात आता वर्षातून दोनदा प्रवेश करता येणार, कशी असणार प्रक्रिया?

2 Times Admission Offers In a Year: अनेकदा परीक्षांचे निकाल उशीरा लागल्याने किंवा काही वैयक्तिक कारणाने विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टच्या सत्रात प्रवेश घेता येत नाही. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता वर्षातून दोनदा प्रवेश घेता येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे. महाविद्यालय किंवा विद्यापीठात एका वर्षात आता दोनदा प्रवेश घेता येणार आहे. परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबात विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने परवानगी दिली आहे. २०२४-२५ शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे.

जुलै- ऑगस्ट आणि जानेवारी फेब्रुवारी अशा दोन वेळा विद्यापीठात प्रवेश घेता येणार आहे,यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्याल विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अनेकदा परिक्षांचा निकाल उशीरा येतो किंवा काही वैयक्तिक कारणामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत आहे. या विद्यार्थ्यांना जरी जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश घेता आला नाही. तरीही हे विद्यार्थी जानेवारी- फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेऊ शकणार आहेत. यामुळे ज्या विद्यार्थ्याला पहिल्या सत्रात प्रवेश घेता आला नाही, त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

वर्षात दोनदा प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने विद्यापीठातील साधनसाम्रगीचा योग्या वापर करता येणार आहे. प्रयोगशाळा, वर्ग या सर्व गोष्टींचा वापर करता येणार आहे. यामुळे विद्यापीठातील काम सुरळीतपणे चालेल. १५ मे २०१४ रोजी झालेल्या बेठकीत युजूसीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यूजीसीने २०२३ मध्ये उच्च शिक्षण संस्थाना ऑनलाइन अभ्यासक्रम आणि ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मोडमध्ये गोन वेळा प्रवेश घेण्याची परवानगी दिली होती. या निर्णयाला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT