UGC NET Exam: यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; तृतीयपंथीयांना मिळणार मोफत उच्च शिक्षण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

NET Exam Will Be Conducted On 18 June: यूजीसी नेट परीक्षा १८ जून रोजी घेतली जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यूजीसी नेट परीक्षा
UGC NET ExamSaam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही नेट परीक्षा येत्या १८ जूनला घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएचडी पदवीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यंदाची नेट परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाणार असल्याची माहिती मिळतेय.

नेट परीक्षा (UGC NET Exam) दोन सत्रात घेतली जाणार आहे. सकाळी साडेनऊ ते साडेबारा या पहिल्या सत्रामध्ये तर दुपारी तीन ते सहा वाजता दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे युजीसी नेट परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर स्लिप प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती देखील जाहीर करण्यात आली (UGC NET Exam Date) आहे.

तृतीपंथीयांना शिक्षणाच्या चौकटीत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांमध्ये यंदाच्या वर्षापासून तृतीयपंथी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण घेता येणार (Free Higher Eeucation for Transgender Student) आहे. या निर्णयानंतर आज तृतीयपंथी तसेच युतक चॅरिटेबल ट्रस्टकडून पुण्यातील बालगंधर्व चौकात रॅली काढत जल्लोष साजरा करण्यात आला आहे.

यूजीसी नेट परीक्षा
SSC Exam Result 2024 : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभागाची बाजी; नागपूरचा निकाल सर्वात कमी

गेल्या काही वर्षांपासून तृतीयपंथीयांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे तृतीयपंथीयांना शिक्षणात सामावून घेण्याच्या हेतूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Savitribai Phule Pune University) एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक टक्का वाढवा, हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च विद्यापीठ निधीतून करण्यात येणार आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयामुळे तृतीयपंथीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

यूजीसी नेट परीक्षा
MPSC Prelims Exam 2024 Date: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; एमपीएससीच्या पूर्व परीक्षेची तारीख बदलली, वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com