Shreya Maskar
चोडण (चोराओ) बेट हे मांडवी नदीतील गोव्यातील सर्वात मोठे नदी बेट आहे, जे पणजीपासून सुमारे ५ किमी अंतरावर आहे. हे बेट शांतता, खारफुटीची जंगले आणि अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे
चोडण बेटावर प्रसिद्ध डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आहे. अभयारण्य विविध प्रकारचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. हे ठिकाण जैवविविधतेसाठी ओळखले जाते.
चोडण बेटावर जाण्यासाठी पणजीजवळील रायबंदर फेरी घाट हा सर्वात जवळचा आणि मुख्य मार्ग आहे. तेथे फेरी बोटीची सेवा उपलब्ध आहे.
तुम्ही येथे वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करू शकता. फोटोशूटसाठी हे लोकेशन खास आहे. निसर्गाच्या सानिध्यात येथे नक्की जा.
गोवा राज्यातील मांडवी नदीच्या पात्रातील चोडण बेट प्राचीन काळी 'चडामणी' किंवा 'चड्डामणी' या नावाने ओळखले जाते. तुम्ही येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात नक्की भेट द्या.
चोडण बेटावर जुन्या पोर्तुगीज विला, ऐतिहासिक चर्च आणि सुप्रसिद्ध देवकीकृष्ण मंदिर आहे. या बेटावर पोर्तुगीज संस्कृती आणि हिंदू परंपरांचा दुर्मिळ मिलाफ पाहायला मिळतो.
चोडण बेटावर गेल्यावर गोव्यातील संस्कृतीचे सुंदर दर्शन घडते. तुम्ही येथे मित्रांसोबत, जोडीदारासोबत, फॅमिलीसोबत ट्रिप प्लान करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही