Chhatrapati Sambhajinagar: विद्यापीठ आंदोलनात गदारोळ, पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट; नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजी नगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विविध दलीत संघटनेतर्फे आज भिमटोला आंदोलन करण्यात आले
Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar NewsSaamtv
Published On

राम ढाकणे, छत्रपती संभाजीनगर|ता. २७ फेब्रुवारी २०२४

Chhatrapati Sambhajinagar News:

छत्रपती संभाजी नगरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर विविध दलीत संघटनेतर्फे आज भिमटोला आंदोलन करण्यात आले. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तोंडाला भगवे वस्त्र बांधत आणि हातात लाठ्या काठ्या घेऊन अचानक घुसलेल्या 30-35 जणांच्या बजरंग दलाच्या टोळक्याने विद्यापीठात धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पार्श्वभूमीवर त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या भीम टोला आंदोलनाला वेगळं वळण लागलं असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी काही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सकाळी 11 वाजेपासून विविध दलित संघटनेतर्फे भिमटोला नावाचा आंदोलन सुरू होते. मात्र दोन तास उलटूनही या आंदोलनाची दखल विद्यापीठ प्रशासनाने घेतली नसल्याने अखेर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर सचिन निकम या आंदोलनकर्त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

Chhatrapati Sambhajinagar News
Beed Crime News : ३ दिवसांचं अर्भक पोत्यात भरून रस्त्यावर फेकलं; घटनेनं परिसरात एकच खळबळ

मात्र पोलीस सतर्क असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. परिणामी यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बरीच झटापट झाली असून काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेवटी पोलीस उपयुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी केली आणि वाद निवळला. विशेष म्हणजे 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी विद्यापीठात अचानक घुसलेल्या तीस-पस्तीस जणांच्या टोलक्यांवर कारवाई करावी यासाठी हे आंदोलन सुरू होते. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhajinagar News
Yuvak Congress Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याने पुण्यातील युवकांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com