Yuvak Congress Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याने पुण्यातील युवकांवर गुन्हा दाखल

Youth Congress : कृषी कायद्यांच्या विरुद्ध पंजाब-हरियाना सीमेवर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी युवक काँग्रेसने पुण्यात आंदोलन केले.
pune police charged five yuvak congress karykarta
pune police charged five yuvak congress karykarta saam tv

- सचिन जाधव

Pune News :

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुण्यात युवक काँग्रेसने (yuvak congress pune) नुकतेच आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी (PM Narendra Modi) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या आंदाेलकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार युवक काॅंग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरुद्ध पंजाब-हरियाना सीमेवर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुण्यातील शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra News)

pune police charged five yuvak congress karykarta
Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार गटास खिंडार? मावळमध्ये पदाधिका-यांचे राजीनामा सत्र, जाणून घ्या कारण

त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पाेलिसांनी माेंदीचा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला. त्यानंतर पाच कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. या आंदाेलनानंतर पाचही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी दिली. या घटनेचा पाेलिस तपास सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

pune police charged five yuvak congress karykarta
Pune Metro : पुणे मेट्रोतून प्रवास करणा-यांसाठी महत्वाची बातमी, शुक्रवारपासून 'ही' सुविधा हाेणार बंद, नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com