Raja Raghuvanshi Case Saam Tv News
देश विदेश

Raja Raghuvanshi Case : बेवफा सोनम! लग्नाआधीच हत्येचा कट, अवघ्या १८ मिनिटात राजाला संपवलं; हत्याकांडाची थरारक कहाणी

Raja Raghuvanshi Case update : सोनमने बॉयफ्रेंड राजच्या साथीने नवरा राजाला संवपलं. राजाला १८ मिनिटांत संपवलं गेलं. या हत्याकांडाची ए टू झेड कहाणी. वाचा

Vishal Gangurde

राजा रघुवंशी प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. राजाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला होता. सोनमने राजाच्या हत्येचा दोन वेळा कट रचला होता. राजा रघुवंशी हत्याकांडाचा मास्टरमाइंड सोनमचा बॉयफ्रेंडच निघाला आहे. या दोघांनी लग्नाच्या आधीच राजाच्या हत्येचा कट रचला होता. शिलाँग पोलिसांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण घटनाक्रम उलगडून सांगितला आहे.

सोनमने लग्नाच्या ११ दिवस आधीच राजाच्या हत्येचा कट रचला होता. हत्या करणारे तिघेही आरोपी हे राजाचे मित्र होते. त्यापैकी एक आरोपी राजाचा चुलत भाऊ आहे. राजाने त्यांना सुपारी दिली नव्हती, मात्र तिघेही मित्रत्वाच्या नात्याने या कटात सहभागी झाले होते. फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा हत्येचा कट रचण्यात आला.

पहिल्या कटानुसार सोनम अचानक बेपत्ता होणार होती. सोनम बेपत्ता झाल्यानंतर तिला नदीत वाहून गेल्यासारखे दाखवायचे होते. दुसऱ्या कटात ठरवले होते की, सोनमची कोणीतरी तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह स्कूटीसह जाळून टाकण्यात आला. यामुळे लोकांना तिची हत्या झाल्याचा आभास निर्माण होणार होता. मात्र हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. यानंतर अखेर राजा आणि सोनम यांचे लग्न झाले.

लग्नानंतर सोनम आणि राजा कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले. याचदरम्यान, तिघेही आरोपी १९ मे रोजी गुवाहाटीत पोहोचले. गुवाहाटीमध्येच राजाची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, तिथेही त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यानंतर तिघे आरोपी आणि राजा यांची भेट नौनगरियात झाली. तिथल्या पार्किंग लॉटमधील टॉयलेटमध्ये राजा गेला. त्यानंतर तिथेच तिघांनी मिळून त्याची हत्या केली. हत्या करताना सोनमदेखील तिथेच उपस्थित होती. राजाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दरीत फेकून देण्यात आला.

तिघांनी दुपारी २ वाजता केवळ १८ मिनिटांत राजाची हत्या केली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून पलायन केलं. सोनमने तिचा रेनकोट आरोपी आकाशला दिला. हत्येनंतर सोनमने आयएसबीटीहून सिलीगुडीसाठी बस पकडली. तिथून ती पटना गेली. पटण्याहून बसने आरा येथे पोहोचल. पुढे आरा येथून ट्रेनने लखनौला गेली. लखनौहून ती इंदूरला पोहोचली. सोनम २६ मे ते ८ जून दरम्यान इंदूरमध्ये होती.

राजा रघुवंशीच्या हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. राजाने सोनमला आधीच सांगितले होते की, 'इंदूरहून बाहेर पडू नको' मात्र, सिलीगुडीला गेल्यानंतर सोनमने तिच्या अपहरणाचा बनाव रचला. सोनम ८ जून रोजी पुन्हा इंदूरला जाणार होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपी ताब्यात घेतला. त्यामुळे उर्वरित आरोपी घाबरले.

हत्येनंतर सोनमने कुटुंबीयांना फोन करून सांगितले की, तिचं अपहरण झालं होतं. त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटली'. या हत्याकांडासाठी मुख्य आरोपीने एकूण ५९ हजार रुपये खर्च केले होते. आरोपी राजकडे स्वतःचे पैसे नव्हते. या प्रकरणात कोणतीही आर्थिक देवाण-घेवाण पोलिसांशी संबंधित आहे का, याचा तपास सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार राज आहे. आरोपींनी तीन वेळा राजाच्या हत्येचा प्रयत्न केला. पण ते चौथ्या वेळी यशस्वी झाले. पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

सोनमने कुटुंबीयांच्या दबावामुळे राजाशी लग्न केले होते. मात्र, लग्नाच्या ११ दिवस आधीच तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडने राजाच्या हत्येचा कट रचला होता. राजाचा मृतदेह २ जून रोजी सापडला. त्यादिवशी सोनम इंदूरमध्ये होती. या प्रकरणाचे सर्व आवश्यक पुरावे पोलिसांकडे आहेत. पोलिस लवकरच म्हणजेच ९० दिवसांच्या आत या प्रकरणात चार्जशीट दाखल करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT