Indur Latest News : भीक देणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार; या शहरात आदेशच काढला

Indur News : भीक देणाऱ्यांविरोधात प्रशासनाने मोठे पावले उचलले आहेत. सरकारने हा आदेश १० शहरात राबवणार आहे. यामध्ये इंदूर शहराचाही समावेश आहे.
beggar in india
BeggarSaam TV
Published On

Beggar Free city : भारताचं सर्वात स्वच्छ शहर इंदूर आता भिकारी मुक्त होऊ इच्छित आहे. शहर भिकारीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी १ जानेवारीपासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्या व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाने सर्वसामान्य लोकांचं टेन्शन वाढलं आहे.

इंदूरच्या प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे. यावर जिल्हाधिकारी आशीष सिंह यांनी म्हटलं की, 'प्रशासनाने इंदूरमध्ये भीक मागण्यास बंदीचा आदेश जारी केला होता. भीक मागण्याच्या विरोधात आम्ही जागरुकता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत करणार आहोत. तर कोणी १ जानेवारी रोजी भीक मागताना दिसणार, त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवला जाईल.

beggar in india
Viral Video: आता काय म्हणावं! भरररस्त्यात काकांचा बाईकस्टंट; VIDEO पाहून नेटकरी हैराण

अधिकारी पुढे म्हणाले, 'मी तुम्हाला आवाहन करतो की, त्यांनी भीक देऊन पापाचे भागीदार होऊ नयेत. भिकाऱ्यांचं पुर्नवसन करण्यासाठी केंद्र सरकारने एक पायलट प्रकल्प आखला आहे. या अंतर्गत इंदूरचा रस्ता भिकारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत १० शहरांचा समावेश आहे. यात दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंदूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पटना आणि अहमदाबादच्या शहराचा समावेश आहे.

beggar in india
Viral Video: पठ्ठ्याने चहाप्रेमींसाठी बनवला हटके जुगाड; बाईकचा वापर करुन बनवले चहा एटीएम; पाहा VIDEO
beggar in india
Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक

भिक्षावृत्तीच्या विरोधात अभियानादरम्यान इंदूर प्रशासनाच्या हाती धक्कादायक माहिती हाती आली. प्रकल्पाचे अधिकारी दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, 'आम्ही जेव्हा रिपोर्ट तयार करतो. तेव्हा काही भिकाऱ्यांचे पक्के घरे असल्याचे आढळून आले. काही जणांचे मुले बँकेत कामाला आहेत. एका भिकाऱ्याकडे २९००० रुपये आहेत. तर एका भिकाऱ्याकडे २९०० रुपये आढळले. तर काही भिकाऱ्यांचा पैसे व्याजाने देण्याचा व्यवसाय आहे. एक टोळी राजस्थानहून लहान मुलांना सोबत घेऊन भीक मागण्यास आली होती. या टोळ्यांमधील मुलांची सुटका केली. ते एका हॉटेलात मुक्कामास थांबले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com