Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक

Maharashtra Bandh update : परभणी घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात आंदोलन केले जात आहे. या घटनेच्या विरोधात काही अज्ञातांनी एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.
Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक
Published On

धुळे : राज्यभरातील विविध जिल्ह्यात परभणीतील घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. परभणीतील घटनेचे पडसाद धुळ्यातही उमटले. धुळ्यात एसटी बसवर दहा ते बारा जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक
Maharashtra Bandh : परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, महाराष्ट्र बंदची हाक

परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परभणीतील आंदोलकांच्या मृत्यू प्रकरणावरून राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. राज्यातील विविध भागात परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनासहित दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.

Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक
Maharashtra Bandh : परभणी घटनेच्या निषेधार्थ बंद; अंबाजोगाई- कळंब राज्य महामार्ग अडवला; मुंबईसह नांदेड, लातूरमध्येही बंद

दुसरीकडे धुळे शहरातील दसरा मैदानात एसटी बसवर दहा ते बारा अज्ञातांकडून बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिक-शहादा बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या दगफेकीनंतर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत. अज्ञातांकडून दगडफेक झाल्याचा चालकाचा दावा आहे.

नेमकं काय घडलं?

धुळे शहरातील दसरा मैदान स्टॉपजवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेत बसमधील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही, असे बस चालकाने सांगितले आहे.

Maharashtra Bandh : परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद; १० ते १२ जणांकडून ST बसवर दगडफेक
Lungs Transplant: सोलापूरमधील 'सम्राट'ला गंभीर आजार, ST कर्मचाऱ्याचे कुटुंब आर्थिक संकटात, मदतीची केली विनंती!

एसटी बसने धुळ्यात प्रवेश केल्यानंतर ही घटना घडली. दसरा मैदान परिसरात आठ ते दहा अज्ञात तरुणांनी या बसवर अचानक दगडफेक सुरू केली. बस चालकाने तत्काळ बस थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, दगडफेक का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परभणी प्रकरणाचे पडसाद असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी पोहोचले. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून दगडफेकीबाबतचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com