Viral Video: आता काय म्हणावं! भरररस्त्यात काकांचा बाईकस्टंट; VIDEO पाहून नेटकरी हैराण

Viral News: सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा अनेक बाईक स्टंटचे व्हिडिओ पाहिले असतील. मात्र बऱ्याच वेळा अनेकांना स्टंटबाजीमुळे जीव गमवावा लागतो. सध्या असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Viral News
Viral VideoSaam Tv
Published On

Stunt Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. कधी थरारक अपघात घडलेले व्हिडिओ व्हायरल होत असतात तर कधी गमतीदार घटनांचे व्हिडिओ असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण होत आहे, ज्यात व्हायरल व्हिडिओ एक तरुण नाही तर चक्क एक व्यक्ती स्कुटी उलटी चालवताना दिसत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक व्यक्ती स्कुटीवर बसून गाडी चालवताना दिसत आहे, मात्र तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की तो व्यक्त सरळ नाही तर स्कुटीवर उलटे बसून स्कुटी चालवत आहे. व्हिडिओ (Video)रस्त्यावर वाहनांची ये-जा सुद्दा आहे मात्र न पडता तो व्यवस्थित मात्र अत्यंच चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवत आहे. संपूर्ण संतापजनक प्रकार रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने कैद केलेला आहे.

काकांचा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल करण्यात आलेला असून तो व्हिडिओ इन्स्टावरील ''yezdaa97'' या पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ मुंबई शहरातील असल्याचे समजत असून आहे. व्हिडिओ व्हायरल होताच ५ हजारपेक्षआ अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे.

एवढेच नाही तर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''अरे देवा'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''हा सरळ गाडी चालवतोय म्हणजे लोक उलटी गाडी चालवतात नक्की आम्हाला सांगावे गाडी कशी चालवावी'',अशा गमतीदार तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral News
Viral Video: मुंबईच्या ट्रेनमध्ये आली हवाईसुंदरी! व्हिडिओ बघून म्हणाल, अरे वाह जबरदस्त!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com