Wedding Viral News
Viral VideoSaam Tv

Viral Video: असाही लग्नसोहळा! मांडवात वराने धनुष्य उचलले अन् बाण मारला, नंतर काय झालं ते पाहाच

Wedding Viral News: आजपर्यंत विविध थीमनुसार लग्न पार पडलेली आपण पाहिली आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर एका अनोख्या लग्नाची मोठी चर्चा होत आहे, ज्यात नक्की काय घडले ते तुम्ही पाहा.
Published on

Weeding Viral Video: सोशल मीडियावर आपल्याला अनेक लग्न सोहळ्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. तरुणाच्या इच्छेनुसार लग्न करण्याच्या पद्धती आणि लग्नातील डेकोरेशन आयडिया विविध असतात, ज्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनतात. सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा अशात एका लग्न सोहळ्याची मोठी चर्चा होत आहे, ज्यात रामायणामधील स्वयंवरचा क्षण पुन्हा एकदा जिवीत केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक लग्न (Wedding)सोहळा दिसत आहे. जिथे रामायणमध्ये झालेल्या स्वयंवर सारखा धनुष्यबाण एका टेबलवर ठेवलेला आहे. त्यानंतर एक एक व्यक्ती येतो आणि तो धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र कोणालाही तो उचलता येत नाही परंतू काही वेळाने नवरदेव तिथे येतो आणि धनुष्यबाण उचलण्यात यशस्वी होतो असे दाखवले आहे. धनुष्यबाण उचलल्यानंतर तो बाण एका लाकडी पोस्टवर मारतो आणि तो पोस्टर तुटून खुद्द नववधु हातात फुलांचा गुच्छ घेऊन बाहेर येते.

हटके लग्न सोहळ्याचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''commentshalla'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या वाऱ्याच्या वेगाने सध्या सर्वत्र पाहिला जात आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातीस एका यूजरने लिहिले आहे की,''मस्तच'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''क्या बात है''तर अशा अनेक यूजर्संनी कौतुकास्पद प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Wedding Viral News
Pimpri-Chinchwad : पापा की परी की 'छपरी'? पिंपरीमध्ये रस्त्यावर तरुणींचा दगडाने हाणामारी करत राडा, Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com