Andheri News: बेस्ट बस चालक वाईन शॉपमध्ये गेला, दारु घेऊन बेधडक निघाला; VIDEO व्हायरल

Shocking Video: ऑन ड्युटी बेस्ट बस चालकाचा दारू दुकानातून दारू घेऊन बसमध्ये जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Shocking Video
Andheri NewsSaam Tv
Published On

Viral Video: गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र कुर्ला पश्चिममध्ये झालेल्या अपघाताची मोठी चर्चा सुरु आहे. ज्यात घटनेत बेस्ट बसला भीषण अपघात होऊन भरधाव बेस्ट थेट मार्केटमध्ये घुसली होती. ही घटना ताजी असताना अंधेरी पश्चिममध्ये ऑन ड्युटी बेस्ट बस चालकाचा दारू दुकानातून दारू घेऊन बसमध्ये जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झाल्यानंतर बेस्ट चालकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता बेस्ट चालक बसमधून उतरतो आणि अंधेरी पश्चिम येथे असलेल्या एका दारूच्या दुकानात जातो. परत येताना त्याच्या हातात एक दारूची बॉटल दिसत असून तो तसच बसमध्ये बस चालवण्यासाठी बसतो. मात्र व्हिडिओत तुम्ही नीट पाहिले तर त्या बस संपूर्ण प्रवाशांनी भरलेली आहे. बस(Bus) चालकाना फक्त आणि फक्त बस वाईन शॉपजवळ दारू खरेदी करण्यासाठी उभी केली होती असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बेस्ट चालकांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कुर्लामध्ये सोमवारी रात्री काय घडले?

सोमवारी रात्री कुर्ला पश्चिमेत रात्री भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली होती. ऐन नागरिकांनी भरलेल्या गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने जखमींचा आकडा वाढला होता. मात्र सध्या अंधेरीतील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित राहिला असून पोलिस याबाबत काय कारवाई करतील हा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Shocking Viral Video: हा काय माणूस हाय! दारु प्यायला अन् खांद्यावर विषारी साप घेऊन रस्त्यावर धिंगाणा, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com