
Shocking Accident Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अनेक थरकाप उडवणारे व्हिडिओ पाहण्यास मिळतात. त्यातच पुन्हा एकदा सोशल मीडियावर अशाच एका थरारक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात भररस्त्यावर एका वाहनाने घोड्याला अनेक फूट उंच हवेत उडवलं आहे, मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक रस्ता दिसून येत आहे. ज्या रस्त्यावरुन अनेक वाहनांची ये-जा दिसून येत आहे. काही वेळात तुम्ही पाहू शकता की एका बाजून रस्त्यावर घोडा गाडी येते मात्र काही क्षणात रस्त्यावर एक भरधाव वेगात कार येत असते, नेमकी या वाहनाची घोड्याला जबर धडक बसते. संपूर्ण अपघाताचा थरार रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीत(CCTV) कैद झालेला आहे.
व्हायरल होत असलेली संपूर्ण घटना उत्तर प्रदेशमधील बागपत येथील असल्याचे दिसते मात्र सध्या संपूर्ण व्हिडिओ ''एक्स'' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून ''@SachinGuptaUP'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र सध्या मोठ्या प्रमाणात सर्वत्र पाहिला जात आहे.
एवढेच नाही तर अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी हैराणजनक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''नक्की चूक कोणाची'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''काय राव काय घडत आहे हे'' तर अनेकांनी ''बापरे'',अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.