Manmad News : माथेफिरूने जाळल्या ६ मोटारसायकली; मनमाड शहरातील घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik News : घराबाहेर उभ्या असलेल्या ६ मोटरसायकल पेटवून दिल्याची घटना मनमाड शहरात घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Manmad News
Manmad NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : घराच्या बाहेर लावलेल्या मोटारसायकलींच्या पेट्रोल नळी काढून त्यांना जाळ्याची घटना मनमाड शहरातील वेगवेगळ्या भागात घडल्या आहेत. रात्रीच्या सुमारास एका माथेफिरूने हा प्रकार केला असून शहरात ६ मोटरसायकली पेटवून दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. दुचाकी जाळतानाचा हा संपूर्ण प्रकार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून एका माथेफिरू समाज कंटकाने आज पहाटेच्या सुमारास धुमाकूळ घालत वेगवेगळ्या भागात जाऊन मोटारसायकल जाळल्या आहेत. घराबाहेर उभ्या असलेल्या ६ मोटरसायकल पेटवून दिल्याची घटना मनमाड शहरात घडली असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Manmad News
Jalgaon News : दुरुस्तीचे काम करत असताना अचानक निसटला ट्रॅक्टरचा जॅक; ट्रॉलीखाली दबून तरुणाचा मृत्यू

रोहित जगताप असे या माथेफिरूचे नाव असून त्याने सुरवातीला दुचाकीच्या पेट्रोल टाकीची नळी काढून टाकली होती. टाकीतील पेट्रोल खाली सांडल्यानंतर त्याने आग लावल्याचा थरार सिसिटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान या माथेफिरूने असा प्रकार कोणत्या कारणातून केला याचे कारण समोर आलेले नाही. दरम्यान मोटारसायकल जाळल्याने यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

Manmad News
Maval News : पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या तरुणांवर काळाचा घाला; पवना धरणात बुडून दोघांचा मृत्यू

आग लावणाऱ्याला अटक 

या प्रकरणी दुचाकीचे नुकसान झालेल्या दुचाकीधारकांनी पोलिसात तक्रार देण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी रोहित जगताप यास अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याने हे कृत्य का केले? आणि त्याच्या सोबत आणखी कोण होतं याचा पोलिस तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com