
Fake Potato: तुम्ही खात असलेला बटाटा केमिकलवाला तर नाही ना...? कारण, तुम्ही खात असलेला बटाटा केमिकलयुक्त असू शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय,त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केल,त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहया व्हायरल व्हिडिओत.
केमिकल वापरून जास्त पैसे कमावण्याच्या नादात ग्राहकांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय.मात्र, आपल्या राज्यात असे केमिकलवाले बटाटे आढळलेले नाहीत.मग हे बटाटे कुठे आढळलेयत पाहुयात.
केमिकलवाले बटाटे उत्तर प्रदेशच्या बलियात आढळले आणि बटाट्यांवर गेरू रंग लावल्याचं आढळून आलं. बटाट्यांना केमिकलसह रंग लावल्याने नवीन दिसतात. सध्या केमिकलयुक्त बटाटे जप्त करण्यात आलेयत. शिवाय केमिकलवाले बटाटे खाल्ले तर काय परिणाम होतात, याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेतली. केमिकलवाले बटाटे खाल्ल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होतात तसचे अंगाचा थरकाप होणे, अपचन होतं, पोटाचा आणि आतड्याचा कॅन्सर होऊ शकतो.
आपल्या राज्यात केमिकलवाले बटाटे आढळलेले नाहीत.मात्र, उत्तर प्रदेशात केमिकलवाले बटाटे आढळल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय,त्यामुळे तुम्ही भाज्या घेताना नीट तपासून घ्या.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.