
Little Girl Video: सोशल मीडियावर तुम्हाला चिमुकल्यांचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात. व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून लहान मुलांचे डान्स पाहण्यासाठी मिळतात तर कधी कोणत्या चिमुकल्यांच्या गाण्याचा व्हिडिओ. सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर दोन लहान बहिणींचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोंघीनी स्टेजवर जाणून असे काही केले की सर्वत्र बहिणींचे कौतुक होत आहे.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एका स्टेजवर दोन लहान चिमुकल्या दिसत आहेत. व्हिडिओत पाहून वाटते की दोघी बहिणी आहेत एवढेच नाही तर दोंघीनी सारख्या रंगाचे कपडे परिधानही केलेले आहेत. यांच्यापाठी काही मान्यवर बसलेले आहेत. काही वेळात एक बहिणी माईक घेऊन गाणं म्हणण्यास सुरुवात करते आणि दुसरी बहिणी गाण्यावर अप्रतिमरित्या डान्स (Dance)करत आहे. लहानगी अतिशय सुंदररित्या डान्सच्या स्टेप्स करत आहे. सर्व व्हिडिओ पाहून तो पाहतच राहावेस वाटत असून तो व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.
दोन चिमुकलींचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, मात्र तो व्हिडिओ ''prem_tho_radhakris'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. तीन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून काही दिवसात लाखोच्या संख्येने नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी व्हिडिओला लाईक्सही केलेले आहे. मात्र व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही.
व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक नेटकऱ्यांच्या पसंतीस आलेला असून बऱ्याच नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''धन्य ते आई-वडिल'' तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''खुप गोड आहेत चिमुकल्या'' शिवाय अन्य यूजर्संनीही चिमुकलीचे कौतुक केलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.