Viral Video: अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस! पुन्हा एकदा चिमुकल्यावर केला हल्ला; पाहा CCTV

Ambernath Video: अंबरनाथमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत चालला असून पुन्हा एकदा एका लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Viral Video
Ambernath VideoSaam Tv
Published On

Dg Attack: गेल्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत चालला आहे. सोशलम मीडियावर आपल्याला या संदर्भात अनेक व्हिडिओ आणि बातम्या ऐकण्यास मिळत असतात. त्यात पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना अंबरनाथमधून समोर आली आहे. जिथे अंबरनाथ पश्चिमेच्या खुंटवली परिसरात एका लहान मुलावर कुत्र्याने हल्ला केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

नेमके घडले तरील काय?

अंबरनाथ(Ambernath) येथील एका भागात लहान मुलगा गल्लीतून चालत जात असताना अचानक एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि अक्षरशः लचके तोडायला सुरुवात केली. ही घटना पाहताच तिथे असलेल्या स्थानिकांनी धाव घेत या लहानग्याची सुटका केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत(CCTV) कैद झाला. या प्रकारामुळे अंबरनाथमधील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ''SaamTvNews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण सांगण्यात आलेले आहे, ज्यात लिहिले आहे की,''Ambernathमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस,चिमुकल्यावर केला हल्ला''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Viral Video
Shocking Video: धक्कादायक... तरुणाच्या अंगावर अचानक आली बस, नशीब चांगले म्हणून वाचला; घटना सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com