Ambernath News: अंबरनाथ पुन्हा हादरले! MIDC मधील कंपनीत मोठा स्फोट; परिसरात भीतीचे वातावरण

Ambernath MIDC Company Blast: अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रसिनो फार्मा कंपनीत रविवारी रात्री मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली.
Ambernath fire news
Aambarnath IMDC Company BlastSaam Tv
Published On

अजय दुधाणे, अंबरनाथ

अंबरनाथमधील एका रासायनिक कंपनीमध्ये स्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंबरनाथ एमआयडीसीमध्ये ही घटना घडली. या स्फोटामध्ये कंपनीचा प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झालला आहे. हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत १० ते १२ कामगार होते. जखमी प्लँट ऑपरेटरला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील रसिनो फार्मा कंपनीत रविवारी रात्री मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील प्लँट ऑपरेटर गंभीर जखमी झाला. अनिल यादव असं गंभीर जखमी झालेल्या प्लँट ऑपरेटरचं नाव आहे. हा स्फोट झाला तेव्हा कंपनीत १० ते १२ कामगार काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Ambernath fire news
Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

रविवारी रात्रीच्या सुमारास अनिल देशमुख कंपनीच्या तळमजल्यावरील प्लँटमध्ये काम करत असताना अचानक प्लँटमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये अनिल यादव पूर्णपणे भाजले असून ही घटना घडल्यानंतर कंपनीतील इतर कामगारांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत आणखी कुणी जखमी आहे का? याबाबतची माहिती मात्र अजूनही समोर येऊ शकलेली नाही.

Ambernath fire news
Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

दुसरीकडे कंपनीतील आग विझवण्याचं काम मध्यरात्रीपर्यंत सुरूच होते. ही आग संपूर्णपणे विझल्यानंतरच कंपनीची पाहणी करून आतमध्ये एखाद्या कामगाराचा मृतदेह सापडतो का? हे पाहावं लागणार असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र या स्फोटामुळे एमआयडीसी भागासोबतच अंबरनाथ शहराच्या पूर्व भागात पाहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे.

Ambernath fire news
Ulhasnagar Crime : भयंकर! खेळता खेळता भाचीला धक्का दिला, जीवच गेला, नंतर मामाने नात्याची हद्द पार केली!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com