Shocking Video: धक्कादायक... तरुणाच्या अंगावर अचानक आली बस, नशीब चांगले म्हणून वाचला; घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो एका मोठ्या अपघातातून सुखरुप वाचला आहे.
Shocking Video
Shocking VideoSaam Tv
Published On

Shocking Video: सोशल मीडियावर अनेकदा अतिशय हैराणजनक गोष्टी व्हायरल होत असतात. अनेकदा त्याचे फोटो असतील तर कधी व्हिडिओही पाहण्यासाठी मिळतात. सध्या सोशल मीडियावर सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणासोबत भयानक अपघात घडतो मात्र त्यात त्याला जराही दुखापत होत नाही. नक्की काय घडले तरुणासोबत ते तुम्ही पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला बस स्थानकाचा परिसर दिसत आहे. मात्र व्हायरल व्हिडिओत या परिसरात एक तरुण एका खुर्चीवर बसलेला आहे. काही वेळात एक बस येते आणि तरुणाच्या पूर्ण अंगावर चढते, कारण या बसवरील चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज आहे मात्र व्हिडिओत तरुणाच्या अंगावर बस चढलेली दिसत आहे. मात्र क्षणात बस चालक बस पाठी घेतो आणि तरुण तेथून उठतो. तरुणाच्या जवळ असलेले सर्व प्रवाशी हैराण झालेले दिसत आहेत. सर्व धक्कादायक घटना जवळील सीसीटीव्हीत(Cctv) कैद झालेली आहे.

व्हायरल व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही मात्र संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ''24onlive'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करुन २२ तास झाले मात्र नेमका कधीची ही घटना आहे हे समजले नाही. सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत.

इन्स्टाग्रामवर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''भावाचे नशिब चांगले होते'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' नक्की घटना कुठली'' तर अनेकांनी बस चालकाविरोद्धात संताप व्यक्त केला आहे तर अनेकांनी हैराणजनक प्रतिक्रिया कमेटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shocking Video
Shocking Video: समोसा विक्रेत्याचे किळसवाणे कृत्य, रेल्वेमधील संतापजनक VIDEO; नेटकरी प्रचंड संतापले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com