Shocking News : हा काय प्रकार? सरकारी नोकरदार तरुणाला मंडपात आणलं, बळजबरीने तरुणीसोबत लग्न लावून दिलं

Bihar shocking news Update : बिहारमध्ये सरकारी नोकरदार तरुणाला मंडपात आणून बळजबरीने लग्न लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने बिहारमधील तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे.
Marriage Problems
Astrology TipsSaam TV
Published On

नवी दिल्ली : बिहारच्या नांलदा जिल्ह्यातील रहुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतून खळबजनक घटना समोर आली आहे. या भागातून एका तरुणाचा बळजबरीने लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहारमधील जगतनंदनपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. पीडित तरुण हा बिहार शरीफ कोर्टात कार्यरत आहे. लव कुमार असे पीडित तरुणाचे नाव आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, लग्नाला नकार दिल्यानंतर तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या माराहणीत मुलगा जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणाचे नातेवाईक देखील घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

Marriage Problems
Vile Parle Crime: पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार; तरूणावर उपचार सुरू

नेमकं काय घडलं?

सरकारी नोकरदार तरुण हा ड्यूटी संपल्यानंतर घरी निघाला होता. त्यावेळी त्याला काही लोकांनी बळजबरीने त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर त्याच्यावर दबाव आणून त्याचं लग्न लावून दिलं. त्याने मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप केला. मात्र, मुलीच्या नातेवाईकांनी आरोप फेटाळून लावला. मुलीच्या नातेवाईकांनी कोणतीही मारहाण केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मुलगा वर्षभरापासून तिच्याशी बोलत होता. तिने लग्न करायची मागणी केली, तर त्याने नकार दिला होता, असं मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

Marriage Problems
Beed Crime News : आवादा ग्रीन पवनचक्की कंपनीकडे मागितली २ कोटीची खंडणी, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी सांगितलं की, युवकाला जिल्ह्यातील सीएससी केंद्रात दाखल केलं. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना बिहारमधील एका रुग्णालयात जाण्यास कळवले. आता या तरुणावर त्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलीच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की, तरुण हा गेल्या वर्षभरापासून तरुणीच्या संपर्कात आहे. मागील वर्षभरापासून बोलणं सुरु आहे.

मुलीने लग्नाची विचारणा केल्यावर तरुणाने नकार दिला. तसेच तरुणाने केलेला मारहाणीचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी फेटाळला आहे. या प्रकराने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

Marriage Problems
Nanded Crime News : पत्नीला नांदायला न पाठवल्याने संपवले सासूला, खूनी जावयाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com