Vile Parle Crime: पार्किंगच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार; तरूणावर उपचार सुरू

Youth killed in fatal attack: मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात पार्किंगच्या वादातून तरूणावर चाकू हल्ला करण्यात आला असून, या चाकू हल्ल्यात संजय गुरव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Vile parle crime news
Vile Parle CrimeSaam Tv
Published On

मुंबईत पार्किंगच्या वादातून एकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हातावर आरोपीने जोरदार वार केला आहे. तरूणाच्या हातातून रक्ताच्या थारोळ्या पडल्या असून, पोलीस हल्लेखोर आरोपीचा तपास करीत आहे. या घटनेनंतर विलेपार्ले परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या विलेपार्ले पूर्व परिसरात पार्किंगच्या वादातून तरूणावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या चाकू हल्ल्यात संजय गुरव नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या हातावर आणि अंगावर हल्लेखोराने वार केला. ज्यामुळे तरूणाचा हात आणि अंगातून रक्ताच्या थारोळ्या पडल्या. जखमी तरूणावर विलेपार्ले पश्चिमेकडील महापालिकेच्या कुपर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

Vile parle crime news
Shahada Crime : लग्न समारंभातून ७ लाखांचे दागिने चोरी; मध्य प्रदेशच्या सासी गँगमधील तिघेजण ताब्यात

ही भयानक घटना ९ डिसेंबरच्या रात्री एक वाजता घडली. पार्किंगच्या वादातून तरूण आणि आरोपीमध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने थेट चाकू काढत तरूणावर जीवघेणा हल्ला केला. वादाच्या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी तरूणी मध्यस्थी करण्यासाठी गेली होती. मात्र, तरूणीला देखील हल्लेखोराने अश्लील शिवीगाळ करून मारण्याचा प्रयत्न केला.

Vile parle crime news
Cyber Crime : वृध्द महिलेची साडे पंधरा लाखाची फसवणूक; सीबीआय व कस्टम अधिकारी असल्याचे सांगत केला बनाव

याप्रकरणी जखमी झालेल्या तरुणाच्या मेहुणीने आरोपी कुणाल सोलंकी विरोधात विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीवर कलम ११८(२),३५२,३५१(२), ७९, १३१ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच पोलीस हल्लेखोर आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com