
Chai lovers: भारतात प्रत्येक एक व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात गरमा-गरम चहा पिऊन होते. मात्र त्यातही अनेक चहा प्रेमी आहे ज्यांना दिवसातून भरपूर वेळेस चहा लागतो. सोशल मीडियावर आपल्याला अनेकदा चहा प्रेमींचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात,परंतू सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात चक्क बाईकवर तरुणाने चहा पिण्याची एक सोय केलेली आहे, मात्र ही सोय नक्की काय आहे हे तुम्ही एकदा व्हायरल व्हिडिओ पाहून समजेल.
व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत एक तरुण दिसतो मात्र या तरुणाने सुरुवातीस बाईकच्या पाठीमागे एक बॉक्स केलेला आहे ज्यात एक चहाचा कप ठेवलेला आहे. तरुण चहाचा कप त्या बॉक्समधून काढतो आणि मग तो चहाचा कप घेऊन बाईकच्या पुढे जातो आणि एक कार्ड घेऊन बाईकच्या पुढे म्हणजे ज्या प्रमाणात एटीएममध्ये कार्ड स्पाईप केले जाते त्याप्रमाणे तो करतो मात्र चक्क बाईकच्या पुढच्या भागातून चहा कपमध्ये पडला जातो,अशा पद्धतीने या तरुणाने चहाप्रेमीसाठी(Tea Lovers) हटके जूगाड शोधून काढलेला आहे.
तरुणाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला असून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''sirswal.sanjay'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कॅप्शनमध्ये,''चाय प्रेमीसाठी नवीन युक्त्या'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज आणि हजारो नेटकऱ्यांनी लाईक केलेले आहे.
एवढेच नाही तर व्हिडिओ व्हायरल होताच बऱ्याच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' त्यालाही पुरस्कार द्या'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,''अरे देवा काय लोकं असतात'' तर अनेकांनी हसण्याचे इमोजी प्रतिक्रिया बॉक्समध्ये दिलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.