Viral Video
Viral Video

Viral Video: थंडीपासून वाचण्यासाठी माणसाने उचललं घातक पाऊल, VIDEO पाहून डोक्याला हात माराल

Viral Video: थंडीने थरथर कापणारी ही व्यक्ती जळत्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर आरामात पडून असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दृश्य कोणालाही आश्चर्यचकित करू शकते, कारण आगीच्या इतक्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक आहे.
Published on

सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती थंडीपासून वाचण्यासाठी अत्यंत धोकादायक पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहे. थंडीने थरथर कापणारी ही व्यक्ती जळत्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर आरामात पडून असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दृश्य कोणालाही आश्चर्यचकित करू शकते, कारण आगीच्या इतक्या जवळ जाणे अत्यंत धोकादायक आहे.

थंडीपासून आराम मिळवण्यासाठी त्या व्यक्तीने लाकडाच्या ढिगाऱ्याला आग लावली आणि त्याचा उबदार पलंग म्हणून वापर केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो माणूस जळत्या लाकड्यावर झोपला. हे दृश्य जितके विचित्र दिसतंय तितकेच धोकादायकही आहे. तथापि व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, तो व्यक्ती काही काळानंतर उभा राहतो आणि कोणतीही इजा न होता तिथून निघून जातो.

Viral Video
Viral Video: दिलजीत दोसांझच्या बंगलोर कॉन्सर्टनंतर दीपिका पादुकोण पहिल्यांदा दिसली लेकीसोबत, पाहा VIDEO

या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, “लोक कंटेंटसाठी काहीही करण्यास तयार असतात." कोणीतरी लिहिले, "तुम्ही कितीही समजावून सांगितले तरी हे लोक समजणार नाहीत." हा व्हिडिओ “out_offun” नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे.

Viral Video
Viral Video: वाह! चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, VIDEO पाहून कराल कौतुक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com