Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! ५ विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे, भंडाऱ्यातील संतापजनक प्रकार

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत ५३ वर्षीय शिक्षकाने चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी विरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On
Summary
  • भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक घटना

  • शिक्षकाने चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा आरोप

  • संतप्त पालकांनी शिक्षकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले

  • पोलिसांनी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

शुभम देशमुख, भंडारा

Bhandara Teacher Physically Abused Girl Student भंडाऱ्यात शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ५३ वर्षीय शिक्षकानं इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिक्षकाला चांगलाच चोप देण्यात आला. तसेच आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील जिल्हा परिषद शाळेत ५३ वर्षीय शिक्षकानं इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणाविषयी मुलींनी आपल्या पालकांना सांगितली. संतप्त पालकांनी आज सकाळी शाळेत जाऊन नराधम शिक्षकाला जाब विचारत चांगलाच चोप दिला.

Bhandara News
Shocking : तरुणाची सटकली, पत्नीसह सासू सासऱ्यांना जिवंत जाळलं; हादरवणारं कारण समोर

त्यानंतर या पालकांनी शिक्षकाला पवनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. वडेगावच्या या शाळेत इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गात १९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील पाच विद्यार्थिनींसोबत या शिक्षकाने लैंगिक छळ केला आहे.

Bhandara News
T20 World Cup 2026 : विजयोत्सव! तिरंग्यासह हार्दिक-इशानचा गरबा-भांगडा;भन्नाट डान्स पाहून माहिका-अदिती झाल्या फिदा, पाहा व्हिडिओ

पवनी पोलिसांनी शिक्षकावर पॉक्सो (POCSO), विद्यार्थ्यांना धमकावणे, मारणे या प्रकारचे गुन्हे दाखल केले असून शिक्षकाला अटक केली आहे.या घटनेनंतर मुली विद्येच्या मंदिरात देखील सुरक्षित नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com