T20 World Cup 2026 : विजयोत्सव! तिरंग्यासह हार्दिक-इशानचा गरबा-भांगडा;भन्नाट डान्स पाहून माहिका-अदिती झाल्या फिदा, पाहा व्हिडिओ

T20 World Cup 2026 Viral Video News : टी-२० विश्वचषक २०२६ अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. विजयाच्या जल्लोषात हार्दिक पंड्या आणि इशान किशन मैदानावर गरबा-भांगडा करताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
T20 World Cup 2026 : विजयोत्सव! तिरंग्यासह हार्दिक-इशानचा गरबा-भांगडा;भन्नाट डान्स पाहून माहिका-अदिती झाल्या फिदा, पाहा व्हिडिओ
T20 World Cup 2026 Viral Video NewsSaam Tv
Published On
Summary
  • अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० विश्वचषक अंतिम सामना पार पडला

  • भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत ट्रॉफी जिंकली

  • हार्दिक पंड्या आणि इशान किशनचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • जगभरातून टीम इंडियाच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव

Ahemdabad Narendra Modi Stadium T20 World Cup Final India Win अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला आणि भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकवला. या जल्लोषात हार्दिक पंड्या आणि इशान किशन विजयाचा आनंद घेत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयसीसीने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे की, टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि इशान किशन तिरंगा धरून आनंद साजरा करत नाचताना दिसत आहेत. विजयाचा आनंद साजरा करताना या जोडीने गरबा आणि भांगडा असे दोन पद्धतींच्या नृत्यशैलीत मैदानावर ठेका धरला. टीम इंडियाच्या विजयानंतर स्टेडियममधील चाहत्यांनी देखील आनंद साजरा केला.

हार्दिक पंड्या आणि इशान किशनचे २०२६ च्या टी-२० विश्वचषक जिंकण्यात मोठा वाटा आहे. टीम इंडियाच्या विजयानंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशन यांच्या गर्लफ्रेंड देखील मैदानावर जल्लोष साजरा करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या. या खास क्षणाचे फोटो सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहेत. दरम्यान जगभरातून टीम इंडियाच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com