Navi Mumbai : नवी मुंबईत कंपनीत गॅस गळती; २५ महिला कामगार बेशुद्ध, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Navi Mumbai Breaking News : नवी मुंबईत कंपनीत गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे २५ महिला कामगार बेशुद्ध झाले. तर अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
Navi Mumbai
Navi Mumbai Breaking News Saam tv
Published On

विकास मिरगणे, साम टीव्ही

नवी मुंबई : नवी मुंबईच्या तुर्भेतील एका कंपनीत गॅस गळतीची घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे कंपनीतील २५ महिला कामगार बेशुद्ध झाल्या. कंपनीतील अनेकांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम झाला आहे. या घटनेनंतर बेशुद्ध झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल केले आहे. या कंपनीतील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे येथील एका कंपनीत गॅस गळतीची घटना घडली. तुर्भेतील एमआयडीसी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळील डी-३२६ क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये ही गंभीर घटना घडली. गॅस गळतीमुळे कंपनीतील महिला कामगारांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तर काहींचं डोके दुखू लागले.

Navi Mumbai
Ahmedabad Plane Crash : २ दिवसांपूर्वी नोकरीचा राजीनामा, लंडनला सेटल व्हायचा निर्णय; विमान अपघातात हसतं खेळतं कुटुंब क्षणात संपलं

गॅस गळतीनंतर काही क्षणात तब्बल २० ते २५ महिला कामगार बेशुद्ध अवस्थेत खाली कोसळल्या. कंपनीतील २७ जणांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम झाला. या लोकांना पुढील उपचारासाठी एमजीएममध्ये दाखल करण्यात आलं आहे.

Navi Mumbai
Ahmedabad Plane Crash : मेहनतीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला; डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा मृत्यू

प्राथमिक माहितीवरून समजते की, तुर्भेच्या एमआयडीसीमधील एका युनिटमध्ये वापरला जाणारा रासायनिक प्रक्रियेमधून कार्बन मोनॉक्साईड (CO)वायू गळती झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कंपनीतील एकूण २७ जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला. या कंपनीतील कामगारांना तात्काळ वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये बहुसंख्य महिला कामगार असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

Navi Mumbai
BJP Politics : आशिष शेलारांच्या समोरच भाजपच्या दोन गटात राडा; कार्यकर्त्यांची तुंबळ हाणामारी

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरजवळील डी-326 क्रमांकाच्या औद्योगिक युनिटमध्ये जनरेटरमधून गॅस गळती झाली. फ्रुट प्रोसिसिंग युनिटमध्ये काम करताना महिलांना निघालेल्या गॅसचा त्रास झाला. जनरेटर सुरू ठेवल्याने यातून कार्बनची गळती झाली. कंपनीतील २० ते २५ महिलांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्याने वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या कामगारांची प्रकृत स्थिर असल्याती माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com