
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या अंजू शर्मा यांच्या बहीणाचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे... कारण अपघाताच्या काही वेळांपूर्वीच अंजूनं बहिणीला फोन केला. मात्र कामात व्यस्त असणाऱ्या बहिणीनं फोन उचचला नाही.. आणि आता पश्चातापानं बहिणीला अश्रू अनावर झालेत.
राजस्थानमधील जोशी कुटुंबावरही काळानं असाच घाला घातलाय. विमान अपघातात राजस्थानमधील संपूर्ण कुटुंबचं उद्ध्वस्त झालंय... प्रतीक जोशी याचं हे कुटुंब आहे... प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते.. पाच वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची तीन मुलं प्रवासात त्यांच्याबरोबर होती.. विमानात बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला.. तो शेवटा सेल्फी ठरलाय..
जोधपूरमधील अरबा इथली रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहितचाही दुर्घटनेत मृत्यू झालाय. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच खुशबू आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. फक्त दोन दिवसांपूर्वीच तिचा पासपोर्ट तयार झाला.. मात्र खुशबूची .सुखी संसाराची स्वप्न अधुरीचं राहिली.
अपघातावेळी 21 वर्षीय एअरहॉस्टेस नगनथोई शर्मा ही एअर इंडियाच्या त्याच विमानात होती. मात्र तिचा मृतदेह अद्याप कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आला नाही. कित्येक कुटुंबांची स्वप्न या विमान अपघातानं उद्ध्वस्त केली..जिवलग माणंस कायमची हिरावली...कितीही सांत्वन केलं गेलं तरी हे दु:ख कायम राहणार आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.