Ghatkopar Station : लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाने जीव गमावला, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

Ghatkopar Railway Station : घाटकोपर स्टेशनवर लोकलची वाट पाहत असणाऱ्या प्रवाशाचा लोकल आणि फ्लॅटफॉर्ममध्ये अडकून मृत्यू झाला.
Ghatkopar Railway Station accident cctv
Ghatkopar Railway Station Saam tv
Published On

मुंबई : मध्य रेल्वे घाटकोपरमध्ये लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घाटकोपरमधील फ्लॅटफॉर्म नंबर एकवर उभा असतााना या प्रवाशाला चक्कर आली. त्यानंतर हा प्रवासी एक नंबरच्या फ्लॅटफॉर्म आणि लोकलमध्ये पडला. प्रवासी लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याची माहिती मिळताच आरपीएफ स्टाफ आणि प्रवासी मदतीला धावले. प्रवाशाला फटीतून बाहेर काढून रुगणालय दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केले.

घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल आणि फलाटामध्ये अडकून एका प्रवासाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संजय जगजप्पा मातंगे असे या प्रवाशाचे नाव आहे. संजय हे फलाटावर लोकलची वाट पाहत उभे होते. त्याचवेळी ७.५८ ची ठाणे लोकल फलाटावर आली. लोकल आल्यानंतर अचानक संजय यांना चकर आली आणि ते थेट लोकलवर आदळून लोकल आणि फलाटाच्या फटीत अडकले.

Ghatkopar Railway Station accident cctv
Navi Mumbai : नवी मुंबईत कंपनीत गॅस गळती; २५ महिला कामगार बेशुद्ध, अनेकांची प्रकृती चिंताजनक

या घटनेनंतर आरपीएफ पोलिसांनी संजय यांना फटीतून बाहेर काढले. त्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत घोषित केले. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे ठाणे दिशेने जाणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम दिसून आला. या घटनेनंतर फ्लॅटफॉर्वर प्रवाशांची एकच गर्दी झाली.

नेमकं काय घडलं?

घाटकोपर रेल्वे स्टेशनवर सायंकाळी 07: 44 वाजता परेलवरून ठाण्याला जाणारी लोकल घाटकोपरला 7: 58 वाजता पोहोचली. हा प्रवासी फ्लॅटफॉर्म नंबरच्या डब्याच्या शिडी आणि प्लॅटफॉर्ममध्ये पडल्याची माहिती दिली. बदलापूरमधील हा प्रवासी फलाट आणि लोकलमध्ये अडकून जखमी स्थितीत अत्यावस्थ झाल्याने प्रवासी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस, होमगार्ड, आरपीएफ स्टाफ घटनास्थळी पोहोचले.

Ghatkopar Railway Station accident cctv
Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! माहीममध्ये भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी स्टेशन मास्तर आणि मोटरमन यांना लोकल हलवू नये, अशा सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी रेल्वे प्रवाशाला प्लॅटफॉर्ममधून रेस्क्यू केले. या प्रवाशाला वाचवण्यासाठी छातीवर सतत पंपिंग केले. मात्र, त्याने हालचाल केली नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न पाहता रिक्षाने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रवाशाला मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com