भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते मध्यप्रदेश राज्यातील भाजपचे दिग्गज नेते होते. ते नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले होते आणि घरी परतत असताना रस्त्यातच ते बेशुद्ध पडले. उपस्थितांनी तात्काळ त्यांना उचलेले आणि त्यांच्या कुटुंबीयांना कळवले. त्यांचे भाऊ अनिल पांडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मनोज पांडे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्यांना मृतघोषित केले. मनोज पांडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शोकळला पसरली आणि राहली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते 55 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा त्यांचा परिवार होता. त्यांच्या अंत्यविधिला भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान भाजपच्या पक्ष स्थापने दिवशीच छत्तीसगडमधील जशपुरचे भाजपचे माजी आमदार जागेश्वर राम भगत यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी (दि 5) रोजी त्यांची प्राणज्योत मालावली. जागेश्वर राम भगत हे केवळ राजकारणातच सक्रिय नव्हते तर त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही महत्वपूर्ण भूमिका बजावली.
त्यांनी वनवासी कल्याण आश्रमच्या सरहुल समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि आदिवासी समाजाच्या अंबू सांस्कृतिक परंपरच्या जतनासाठी अविरतपणे कार्यरत राहिले. त्याच्या निधनाने या छत्तीसगढच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या निधनाच्या बातमी समजताच त्यांच्या समर्थक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये शोककळा पसरली. अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. जशपूर आणि आसपासच्या परिसरातील लोक त्यांना एक साधे, मनमिळाऊ आणि सामाजिक बांधिलकी असलेले नेते म्हणून स्मरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.