Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...

Nandurbar News: नंदुरबारमध्ये पहाटेच्या सुमारास अचानक जमीन हादरली. घरातील वस्तू खाली पडल्या. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. सध्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...
Nandurbar EarthquakeAI Image
Published On: 

नंदुरबारमध्ये पहाटे अचानक भूकंपासारखे हादरे बसले. त्यामुळे झापेत असलेले नागरिक जागे झाले आणि घाबरून त्यांनी थेट घराबाहेर धाव घेतली. नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसरात पहाटे जमीन हादरली. घरातील वस्तू देखील खाली पडल्या. त्यानंतर शहरामध्ये भूकंप आला भूकंप आला अशी चर्चा होऊ लागली. शहरात भूकंप झाल्याच्या अफवेने घबराट पसरली. भूकंप झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली. पण नंतर काळले की तो भूकंप नव्हता तर मुरूम उत्खननाच्या नावाखाली डोंगरात घडवले भयंकर स्फोट होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नंदुरबार शहरातील धुळे चौफुली परिसर अचानक हादरल्याने नागरिकांमध्ये भूकंपाची भीती पसरली. घरातील खुर्च्या खाली पडल्याने सोशल मीडियावर भूकंपाच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, या थरकापामागचं धक्कादायक सत्य समोर आलं. हा भूकंप नसून स्फोटके लावून अवैध ब्लास्टिंगचा प्रकार असल्याचं उघड झालं आहे. धुळे चौफुलीच्या टेकड्यांवर श्री गणपती भारत प्रा. लि.कंपनीने हे अवैध ब्लास्टिंग केल्याचे समोर आले.

Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...
Yavatmal Earthquake: ऐन दुपारी जमीन हादरली, घरांच्या भिंती थरथरल्या! भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांची धावपळ

श्री गणपती भारत प्रा. लि.कंपनीला फक्त १ हजार १०० ब्रास मुरूम उत्खननाची परवानगी होती. परंतू कंपनीने नियम धाब्यावर बसवून स्फोटकांचा वापर करत अवैधरित्या तब्बल ३०० ब्रास दगडाचे उत्खनन केले. या गंभीर प्रकाराची दखल घेत नंदुरबारचे तहसीलदार संतोष डेरे यांनी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. संबंधित कंपनीला १९ लाख ९ हजार ९२० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून उत्खनन आणि वाहतूक तात्काळ थांबवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. या कंपनीने स्फोटकांच्या मदतीने 300 ब्रास दगडाची चोरी केल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...
Earthquake : बुलढाणा-जळगाव परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची घराबाहेर पळापळ

दरम्यान, १६ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. भूकंप मापकावर ३.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. ४ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास भूकंप आला होता. जमिनीपासून ५ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्रबिंदू होतं. चंद्रपूर शहरापासून ३५ किलोमीटर अंतर असलेल्या कुरली गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे कुठल्याच प्रकारचं नुकसान झालं नसल्याची प्रशासनाची माहिती दिली.

Nandurbar Earthquake: पहाटे अचानक जमीन हादरली, भूकंप आला म्हणत नागरिकांची घाबरून घराबाहेर धाव; पण...
Earthquake : गाढ झोपेत असताना जमीन हादरली, घाबरून नागरिक घराबाहेर धावले, ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.