

यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे भूकंपाची नोंद
भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी होती.
दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
संजय राठोड,साम प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. गावात पहिल्यांदाच भूकंपाचे हादरे जाणवल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे हादरे जाणावले. त्यानंतर नागरिक भीतीने सैरवैर पळू लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे ३.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क झाले असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून परिसरातील परिस्थितीची माहिती घेण्यात आली आहे. या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एकलासपूर परिसरात पहिल्यांदाच भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही मोठी हानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.