जमीन हादरली, घरं थरथरली; पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

Palghar Earthquake Today Magnitude 2.3 In Dahanu Taluka: पालघरच्या डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. धुंदलवाडी, दापचरी, करंजविरा, धानिवरी आणि चारोटी परिसरात २.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप नोंदवण्यात आला.

रुपेश पाटील, साम टीव्ही

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवाला आहे. धुंदलवाडी, दापचारी, करंजविरा, धानिवरी आणि चारोटी या भागांमध्ये आज संध्याकाळी सुमारे 6 वाजून 5 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 2.3 इतकी नोंदवण्यात आली.

भूकंपाचा धक्का सौम्य असला, तरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com