Women's Reservation Bill: महिला आरक्षणासाठी केंद्र सरकारचा मोठा प्लॅन! लोकसभेच्या जागा ५४३ वरून थेट ८५० होणार? विशेष अधिवेशनात काय घडणार?

Parliament Special Session: महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारची तयारी सुरू झाली आहे. ३० नोव्हेंबरपासून संसदेचं विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या जागा ८५० करण्याचा प्रस्ताव असून, विधेयक मंजूर करण्यासाठी ३६१ खासदारांच्या मतांची गरज आहे.
Women's Reservation Bill
Women's Reservation Billsaam tv
Published On: 

महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना या मुद्द्यांवर केंद्र सरकारने पुन्हा तयारी सुरू केलीये. यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव सरकारने मांडलाय. हे अधिवेशन ३० नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा संसदेत मांडलं जाऊ शकतं. त्याआधी शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. विशेष अधिवेशनासाठी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे विनंती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

Women's Reservation Bill
Sanjay Raut: सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास शपथविधीला उपस्थित राहणार, संजय राऊतांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

लोकसभेचं कामकाज ३० नोव्हेंबरपासून सुरू होणार

सरकारच्या प्रस्तावानुसार, लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर राज्यसभेचं कामकाज २ डिसेंबरपासून सुरू करण्याचं नियोजन आहे. सरकारी कामकाज किती आहे, यानुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज ३ डिसेंबर रोजी संपण्याची शक्यता आहे.

लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० होणार?

प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकात लोकसभेच्या जागा वाढवण्याची तरतूद करण्यात आलीये. सध्या लोकसभेत ५४३ जागा आहेत. ही संख्या वाढवून कमाल ८५० करण्याचा सरकारचा विचार आहे. मतदारसंघांची नव्याने रचना करून जागांची संख्या वाढवली जाणार आहे. या बदलानंतर लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची सरकारची योजना आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण लागू करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यातही सरकारने हे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण आवश्यक तेवढ्या खासदारांचं समर्थन न मिळाल्याने घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होऊ शकलं नव्हतं.

Women's Reservation Bill
पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

विधेयक मंजूर करण्यासाठी ३६१ खासदारांच्या मतांची गरज

घटनादुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी लोकसभेत दोनतृतीयांश बहुमत आवश्यक असते. सध्या लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५४३ आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करण्यासाठी ३६१ खासदारांच्या मतांची गरज आहे. लोकसभेच्या तीन जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सभागृहात ५४० खासदार आहेत.

सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे सध्या सुमारे ३२० खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसमधील २० बंडखोर खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय. या गटाने भारतीय राष्ट्रीय नागरिक पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे.

Women's Reservation Bill
Weather Update: थंडी गायब, पावसाचा धुमाकूळ सुरूच; १० ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज; ताशी ६० किमीच्या वेगाने वारे वाहणार

याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. पण एवढं समर्थन मिळूनही घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला आणखी खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे द्रमुकचे २२ खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आठ खासदार यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.