

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने भाजप १ ते २५ डिसेंबर दरम्यान 'सेवा दूत' अभियान राबवणार आहे. या अंतर्गत नेते आणि कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सरकारी योजनांचा आढावा घेतील. याचबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. या २५ दिवसांच्या अभियानात भाजपचे वरिष्ठ नेते देशातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन मुक्काम करतील.
या अभियानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पनवेल येथे आयोजित ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. या कार्यशाळेत अभियानाची कार्यपद्धती, सूक्ष्म नियोजन आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना रविंद्र चव्हाण यांनी आवाहन केले की, “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.