Manasvi Choudhary
वाढत्या वयानुसार केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे. मात्र, आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण वयात देखील केस पांढरे होतात.
सुरूवातील केसांमध्ये एक-दोन पांढरे केस दिसले की आपण ते लगेच उपटून काढतो; पण पांढरे केस उपटून काढावे की नाही आणि त्यामुळे काय होऊ शकते, हे देखील समजून घेणे महत्वाचे आहे.
पांढरे केस जबरदस्तीने उपटून काढल्याने केसांच्या मुळांना इजा पोहोचू शकते आणि त्या भागातील केस विरळ होण्याची शक्यता वाढते.
वारंवार एकाच जागी केस उपटून काढल्याने त्वचेवर टाळूवर जळजळ किंवा हायपरपिग्मेंटेशन होण्याची शक्यता वाढू शकते.
वारंवार पांढरे केस ओढण्यामुळे केसांच्या मुळांना त्रास होतो आणि केस गळू लागतात.
अपुरी व पुरेशी झोप न घेतल्याने शरीरातील नैसर्गिक संतुलनावर परिणाम होतो आणि केस गळतात किंवा पांढरे होतात.
कामाचा किंवा मानसिक तणाव दीर्घकाळ राहिल्यास केसांच्या आरोग्यावर परिणाम दिसू शकतो.
आहारात आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस अकाली पांढरे होऊ शकतात.
कुटुंबात लवकर पांढरे केस होण्याची समस्या कोणाला असेल तर अनुवंशिक पार्श्वभूमी असल्यास तरुण वयातही केस पांढरे होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.