Manasvi Choudhary
महेश्वरी साड्यांना सध्या महिलांची विशेष पंसती आहे. सणासुदीला, लग्नकार्यासाठी महिला महेश्वरी साड्यांची निवड करतात.
महेश्वरी साड्यांमध्ये लेटेस्ट पॅटर्न आणि कोणते रंग आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
महेश्वरी साड्यांमध्ये जांभळा रंग अधिक उठून दिसतो. या साडीवर सोनेरी रंगाची बॉर्डर असते त्यामुळे साडी सुंदर दिसते.
गुलाबी रंगाची महेश्वरी साडी तुम्ही निवडू शकता. या साडीवरच्या बुटी वर्क डिझाईनमुळे पारंपारिक लूक मिळतो.
खास पूजा आणि सणासुदीला तुम्ही हिरव्या रंगाच्या शेड्समध्ये मोरपंखी महेश्वरी साडी निवडा. महेश्वरी साडी हलकी आणि नेसण्यासाठी सोपी असते.
लग्नात हळदीच्या कार्यक्रमासाठी महिला व मुली पिवळ्या रंगाची साडी निवडतात. तुम्हालाही साडी घ्यायची असेल तर तुम्ही पिवळा रंगाची महेश्वरी साडी निवडा.
मरूम रंगाची महेश्वरी साडी ही उठून दिसते. अस्सल महेश्वरी साडीची जरीची किनार दोन्ही बाजूंनी सारखीच विणलेली असते, ज्यामुळे ती दोन्ही बाजूंनी वापरता येते.