Manasvi Choudhary
पैठणी साडी महिलांच्या आवडीचा साडी प्रकार आहे. सध्या मुनिया पैठणी या साडीचे महिलांमध्ये विशेष आकर्षण आहे.
तुम्हालाही पैठणी साडी घ्यायची असेल तर तुम्ही मुनिया पैठणी साडी निवडा.
सिंगल मुनिया बॉर्डर पैठणी पॅटर्नमध्ये साडीच्या जरी काठावर एका रांगेत नाजूक पोपटांची नक्षी असते. त्यामुळे ही साडी लोकप्रिय आहे.
ज्या महिलांना राजेशाही लूक हवा असतो, त्यांच्यासाठी ट्रिपल मुनिया बॉर्डर बेस्ट आहे. या साडीच्या काठावर पोपट नक्षीकामाच्या तीन समांतर रांगा असतात, ज्यामुळे साडीला अधिक उठावदार आणि पारंपारिक रूप मिळतो.
बांधणी साडीच्या मुख्य भागावर पारंपारिक बांधणीचे ठिपके किंवा नक्षी आणि काठावर जरीची मुनिया बॉर्डर असते.
पिकॉक पल्लू या डिझाईनमध्ये साडीच्या पदरावर सोनेरी जरीवर्क रंगीबेरंगी पोपट, मोर आणि वेलबुट्टीचे असते. नववधू किंवा लग्नसमारंभासाठी हा पॅटर्न तुम्ही निवडू शकता.
टिश्यू सिल्क मुनिया पैठणी या साड्या सुंदर दिसतात. नेसायला हलक्या आणि सोप्या असतात.