Nepal PM : देशात 'शाह' पर्व सुरू! सर्वात तरूण नेत्यानं घेतली पंतप्रधानपदाची शपथ

balen shah becomes youngest prime minister of nepal : नेपाळमध्ये इतिहास रचला गेलाय. प्रसिद्ध रॅपर आणि माजी महापौर बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शाह देशातले सर्वात तरूण पंतप्रधान ठरले आहेत.
नेपाळमध्ये शाह पर्व सुरू, सर्वात तरूण नेत्यानं घेतली पंतप्रधानपदाची शपथ
Nepal PM Balen Shahsaam tv
Published On

नेपाळमध्ये २७ मार्च २०२६ पासून शाह पर्वाला सुरुवात झालीय. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर अशी ख्याती असलेल्या बालेन शाह (बालेंद्र शाह) यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शाह यांच्या रुपानं नेपाळला सर्वात तरूण पंतप्रधान मिळाले आहेत. अवघ्या ३५ वर्षांच्या असलेल्या शाह यांनी पक्षाला प्रचंड बहुमत मिळवून दिलं. शाह यांनी प्रचंड बहुमतानं मिळवलेल्या विजयानं नेपाळमधील राजकीय घराणेशाही आणि दिग्गज पक्षांचं वर्चस्व संपुष्टात आणलं.

राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनातील शीतल निवासात बालेन शाह यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी शाह यांनी आज दुपारी १२.३४ वाजताची वेळ निवडली होती. हिंदू ज्योतिष आणि पंडितांनुसार, ही वेळ शुभ मानली जाते, तसेच हा १-२-३-४ चा अनोखा पॅटर्न ठरला आहे. त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.

बालेन शाह हे सर्वोच्च पदावर पोहोचलेली मधेश वंशाची पहिली व्यक्ती ठरली आहे. बालेन यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) ने अलीकडेच झालेल्या निवडणुकीत २७५ पैकी १८२ जागांवर विजय मिळवून जवळपास दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले होते. या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर बघायला मिळाला. बालेन शाह यांनी झापा - ५ मतदारसंघातून नेपाळचे चार वेळा पंतप्रधानपद भूषवलेले आणि कम्युनिस्ट पक्षाचे (UML) दिग्गज नेते के. पी. शर्मा ओली यांना मोठ्या फरकाने पराभूत केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com