Sakshi Sunil Jadhav
हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यात एक असं ठिकाण आहे, जिथे जाताच तुम्ही नेपाळ सारखे हुबेहुब दृश्य पाहू शकता.
तिथल्या मोरनी हिल्स मिनी नेपाळसारख्या दिसतात. जे हिल स्टेशन म्हणून ओळखलं जातं. त्याच्या चारही बाजूला शांतता असते.
तुम्ही मोरनी हिल्सला तुमच्या फॅमिलीसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत किंवा तुमच्या पार्टनरसोबत जाऊन सुंदर निसर्गात वेळ घालवू शकता.
मोरनी हिल्स ही उंचावर, डोंगरात आणि घनदाट जंगलात आहे. जिथलं वातावरण खूप शांत आणि सुंदर आहे.
मोरनी हिल्सवर तुम्ही मित्र- मैत्रिणींसोबत ट्रेक किंवा एडवेंचर प्लान करु शकता. त्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
तुम्हाला यासाठी विमानाने २-३ तास किंवा रेल्वेने १५ - २० तासाचा प्रवास करावा लागेल.
तुम्ही चंदीगडला उतरुन तिथून २ तासात मोरनी हिल्सला भेट देऊ शकता. तिथे खाजगी वाहने उपलब्ध असतात.
तुम्ही तिथल्या जवळच्या माउंटन क्वेल टुरिस्ट रिसॉर्टवर राहू शकता. हे ठिकाण तलावाजवळच आहे. तिथून दृश्यही चांगली दिसतात.
तुम्हाला होम स्टे साठी इनस्केप इको व्हिलेजमध्ये राहता येऊ शकते. संपूर्ण निसर्गाच्या मधोमध असणारे हे ठिकाण आहे.