Sakshi Sunil Jadhav
संध्याकाळजवळ येताच अनेकांना एक छोटी भूक लागते. यामध्ये अनेकांना मेहनत घ्यायची नसते. पण काहीतरी चटपटीत खायचं असतं.
पुढे आपण अशीच एक भन्नाट सोपी आणि फक्त ५ मिनिटांत तयार होणारी रेसिपी जाणून घेणार आहोत. जी तुम्हाला आयुष्यभर खाता येऊ शकते.
उकडलेले लहान बटाटे, तेल किंवा बटर, मीठ, लाल तिखट, चाट मसाला, भाजलेले जिरे पावडर, हिरवी चटणी, गोड चिंचेची चटणी, दही, बारीक चिरलेले कांदे आणि कोथिंबीर, बारीक शेव इ.
सर्वप्रथम उकडलेले बटाटे सालासकट घ्या. बटाटा एका सपाट वाटीने किंवा जड काचेच्या मागील बाजूने हलका दाबून तो सपाट करा.
आता एका पॅनवर तेल किंवा बटर गरम करा. त्यात हलक्या हाताने चपटे केलेले बटाटे ठेवा. मध्यम आचेवर नेरी तपकिरी होईपर्यंत आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शिजवा.
बटाटे बाहेरुन क्रिस्पी झाल्यावर ते काढून त्यावर थोडं मीठ, लाल तिखट, भाजलेलं जिरं आणि भरपूर चाट मसाला त्यावर भुरभुरून घ्या.
आता कुरकुरीत मसालेदार बटाट्यांवर फेटलेले दही, मसालेदार हिरवी चटणी आणि गोड चिंचेची चटणी घाला. तुम्हाला आवडत असल्यास, तुम्ही डाळिंब सुद्धा घेऊ शकता.
शेवटी, हे चाट लगेच सर्व्ह करा, त्यावर बारीक चिरलेला कांदा, ताजी कोथिंबीर आणि भरपूर बारीक चिरलेली शेव घाला. बटाट्याचा कुरकुरीतपणा टिकवून ठेवण्यासाठी ते गरम असतानाच खा.