Rajasthan Shocking News  Saam Tv
देश विदेश

Shocking: दारू समजून केमिकल प्यायले, ३ महिलांसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

4 Family Members Die After Drinking Chemical: राजस्थानमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा दारू समजून केमिकल प्यायल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Priya More

Summary -

  • राजस्थानच्या भीलवाडामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

  • दारू समजून केमिकल प्यायल्याने विषबाधा झाली

  • मृतांमध्ये ३ महिला आणि १ पुरुषाचा समावेश

  • पोलिसांकडून तपास सुरू

राजस्थानच्या भीलवाडामध्ये हृदयद्रावक घटना घडली. लग्न समारंभानंतर दारू समजून केमिकल प्यायल्याने चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. चौघेही एकाच कुटुंबातील होते. हे चौघेही लग्न समारंभामध्ये जेवणाचे भांडी घासण्यासाठी आले होते. त्यांनी दारू समजून भांडी साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल प्यायले.

दारू समजून केमिकल प्यायल्यामुळे ३ महिला आणि एका पुरूषाची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी ३ महिलांना मृत घोषीत केले. तर एका पुरूषाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. उपचारादरम्यान या व्यक्तीचा देखील मृत्यू झाला.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षक धर्मेंद्र सिंह यादव यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. राजस्थान सरकारने मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पोलिस प्रत्येक दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी भीलवाडा शहरातील एका केमिकलच्या दुकानातून तपासणीसाठी केमिकलच्या बॉटल जप्त केल्या आहेत.

स्थानिक रहिवासी हरदयाल सिंह यांनी सांगितले की, १० तारखेला आलूली गावात शैतान सिंग यांच्या घरी लग्न समारंभ होता. ११ तारखेला काही लोक परिसर स्वच्छ करण्यासाठी आले होते. साफसफाई करताना त्यांनी काही बाटल्या सोबत आणल्या होत्या. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले, मृत व्यक्ती दररोज दारू पित होते. १२ तारखेला गुरुवारची सुट्टी असल्याने ते दिवसा बसून बाटल्यांमधील केमिकल दारू समजून प्यायले. त्यानंतर रात्री ८ ते १० च्या दरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे सर्वजण एकाच कुटुंबातील होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT