Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं

Pune News: पुण्यामध्ये एका तरुणाने वडिलांची निर्घृण हत्या केली. दारूच्या वादातून या तरुणाने वडिलांना जिवंत जाळलं. गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Pune CrimeSaam Tv
Published On

Summary -

  • दारूच्या वादातून मुलाने केलं भयंकर कृत्य

  • वडिलांवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले

  • उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू

  • पोलिसांनी आरोपीला केली अटक

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये एका तरुणाने आपल्या वडिलांना भयंकर मृत्यू दिला. दारु पिण्यावरून वाद झाल्यानंतर तरुणाने आपल्या वडिलांना जिवंत पेटवून दिलं. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात दारूच्या नशेत मुलाने थेट बापाला जिवंत जाळले. तरुणाने वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकत पेटवून दिले. पुण्यातील पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेत तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला. रवींद्र भालेराव असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव होते. या प्रकरणी पर्वती पोलिसांनी आरोपी सागर भालेरावविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. तरुणाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Crime News : धक्कादायक! मंगळसूत्रावरून जावा-जावांची भांडणं, मोठीनं छोट्या जावेचा जीव घेतला अन्...

रवींद्र भालेराव सुतार काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांचा मुलगा सागर भालेराव याला दारूचे व्यसन असून वारंवार तो दारू पिऊन घरात वडिलांसोबत वाद घालत होता. याच वादातून त्याने ७ फेब्रुवारी रोजी रागाच्या भरात वडिलांच्या अंगावर पेट्रोल टाकत त्यांना पेटवून दिले. या घटनेमध्ये रवींद्र भालेराव गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रवींद्र यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पर्वती पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime पुणे हादरले! दारू पिण्यावरून टोकाचं भांडण, तरुणाने बापाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
Crime News : धक्कादायक! कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं; ११ महिन्यांत ३० वेळा बलात्कार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com