Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले

doctor sold newborn baby in Bhandara Maharashtra: भंडाऱ्यामध्ये डॉक्टरनेच नवजात बाळाची विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आले. तस्करीचे मोठे रॅकेट उघड झाले असून या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले.
Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले
bhandara Crime Saam Tv
Published On

Summary -

  • भंडाऱ्यात नवजात बालिकेची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस

  • गोंदिया येथील एका डॉक्टरचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल

  • चाइल्ड हेल्पलाइनच्या माहितीनंतर पोलिसांनी कारवाई केली

  • पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला

शुभम देशमुख, भंडारा

भंडारा जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे नवजात बालिकेची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशन वरठी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये डॉ. नितेश वाजपेयी यांचा समावेश आहे. नितेश वाजपेयी यांचे रामनगर गोंदिया येथे बालाजी क्लिनिक आहे. डॉक्टराच्या मदतीने नवजात बालिकांच्या तस्करी होत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

२ फेब्रुवारी २०२६ रोजी महिला व बाल विकास विभागाच्या 'चाइल्ड हेल्पलाइन'वर माहिती मिळाली की, पांढराबोडी येथील मालती प्रकाश वाघमारे (वय ४४ वर्शे) या महिलेने १० दिवसांची नवजात बालिका बेकायदेशीररित्या घरी आणली आहे. या माहितीच्या आधारे चाइल्ड हेल्पलाइनच्या समुपदेशकांनी मालती वाघमारेच्या घरी जाऊन चौकशी केली. तिने ही बालिका गोंदियातून आणल्याचे सांगितले. बाल कल्याण समिती, भंडारा यांच्यासमोर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही मालती वाघमारे हजर झाली नाही. यानंतर वरठी पोलिसांत माहिती देण्यात आली.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले
Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल

पोलिसांनी तातडीने तपास करत कुशारी फाटा येथे नाकाबंदी करून एक वाहन अडवले. या वाहनात पोर्णिमा सतीश धुर्वे (रा. रामनगर, गोंदिया) या महिलेच्या ताब्यात ती नवजात बालिका सापडली. तपासादरम्यान असे समोर आले की, गोंदियातील एका डॉक्टरने पैशांच्या बदल्यात ती नवजात बालिका मालती वाघमारेला विकली होती. पोलिस तपासात या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार गोंदिया येथील एक डॉक्टर असल्याचे समोर आले. या डॉक्टरनेच ललेश्वरी नंदकिशोर सादेपाय (रा. रामनगर, गोंदिया) या महिलेच्या माध्यमातून ही बालिकेची विक्री केली.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले
Shocking: ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळाली, लग्नाची तयारी पूर्ण झाली पण...

पोलिस स्टेशन वरठी येथे याप्रकरणी डॉ. नितेश वाजपेयी (मुख्य सूत्रधार), मालती प्रकाश वाघमारे (वय ४४, रा. पांढराबोडी), ललेश्वरी नंदकिशोर सादेपाय (वय ३९, रा. रामनगर, गोंदिया), पोर्णिमा सतीश धुर्वे (वय ३०, रा. रामनगर, गोंदिया), उमेशसिंग रामचंद्रसिंग गहलौत (वय ४८, रा. गोंदिया) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस स्टेशन वरठी येथे भा.न्या.सं. कलम १४२(४), १३७(२), १३७(५) आणि अल्पवयीन न्याय कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी डॉक्टर आणि त्याचे इतर साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Crime: डॉक्टरकडूनच नवजात बाळाची विक्री, तस्करीचं मोठं रॅकेट उघड; भंडारा हादरले
Shocking: नवीन गर्लफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, आधीच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com