Shocking: ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळाली, लग्नाची तयारी पूर्ण झाली पण...

Woman Runs Away With 15 years Old Nephew in UP: उत्तर प्रदेशमध्ये ३५ वर्षीय महिला १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळून गेली. हे दोघे लग्न करणार होते पण तेवाढ्यात पोलिसांनी त्यांना पकडलं.
Shocking: ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळाली, लग्नाची तयारी पूर्ण झाली पण...
Woman Runs Away With 15 years Old Nephew in UPSaam Tv
Published On

Summary -

  • गोरखपूरमध्ये ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्यासोबत पळून गेली

  • दोघेही लग्न करण्याच्या तयारीत होते पण तेवढ्यात पोलिस तिथे पोहचले

  • पोलिसांनी लग्नाआधीच त्यांना ताब्यात घेतले

  • बराच वेळ समजावून सांगितल्यानंतर दोघांना घरी पाठवण्यात आले

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ३५ वर्षांची महिला १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळून गेली. ही संतापजनक घटना पीपीगंज भागात घडली. नववीमध्ये शिकणाऱ्या मुलाच्या प्रेमात त्याची ३५ वर्षांची काकी वेडी झाली. ही महिला या मुलाला घेऊन पळून गेली. या घटनेची उत्तर प्रदेशमध्ये चर्चा होत आहे. हे दोघे लग्न करणार होते पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महिला आणि तिचा १५ वर्षांचा पुतण्या अचानक बेपत्ता झाले. ते दोघं बेपत्ता असल्याचे कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांचा शोध घेतला. पण समाजात कुठेही बदनामी होऊ नये यासाठी सुरूवातीला त्यांनी हे प्रकरण दाबून ठेवले. पण बरेच दिवस झाले तरी कुठेच भेटले नाही त्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांचा शोध घेतला. ते दोघे शहरामध्येच होते. पोलिसांनी त्यांना ताब्यत घेतले. दोघं लग्न करणार होते पण त्याआधीच पोलिस पोहचले. दोघांची समजूत काढून पोलिसांनी त्यांना घरी पाठवले.

Shocking: ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळाली, लग्नाची तयारी पूर्ण झाली पण...
Shocking: भिंतीवर कारण लिहिले, व्हिडिओही काढला; आई-वडील अन् ३ मुलांची सामूहिक आत्महत्या

चौकशीमध्ये काकी आणि पुतण्या दोघांनी सांगितले की त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघे लग्न करणार होते. पण पोलिसांनी त्यांना पकडले. कुटुंबीय आणि पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण ते दोघेही घरी जाण्यास तयार नव्हते. ते लग्न करण्याचा आग्रह धरत होते. पण बराच वेळ समजवल्यानंतर दोघं घरी परत आले. या प्रकरणी दोघांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार आली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Shocking: ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळाली, लग्नाची तयारी पूर्ण झाली पण...
Shocking: मोठ्या बहिणीच्या अस्थी विसर्जनासाठी वाराणसीला आले, हॉटेलच्या खोलीत बहीण-भावाने उचललं टोकाचं पाऊल

ही घटना पीपीगंज पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात घडली. नववीत शिकणारा एक विद्यार्थी त्याच्या काकीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबत पळून गेला. सोमवारी दोघे लग्न करणार होते तेव्हा पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा कळाला. ते लग्न करण्यापूर्वीच पोलिस तिथे पोहचले. चौकशीदरम्यान त्यांनी प्रेमात पडल्याची आणि लग्न करणार असल्याची कबुली दिली. या दोघांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघांचे नाते असे आहे की कुणालाच काही संशय आला नाही. दोघेही फोनवर तासंतास बोलायचे.

Shocking: ३५ वर्षांची काकी १५ वर्षांच्या पुतण्याला घेऊन पळाली, लग्नाची तयारी पूर्ण झाली पण...
Shocking: नवीन गर्लफ्रेंडसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, आधीच्या गर्लफ्रेंडचा गळा दाबला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com