Shocking : आजारपणाला वैतागला, ३० वर्षाच्या तरूणाची आत्महत्या; भंडाऱ्यात हळहळ

Bhandara Crime : भंडारामध्ये दीर्घकालीन आजाराला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
Shocking : आजारपणाला वैतागली, ३० वर्षाच्या तरूणाची आत्महत्या; भंडाऱ्यात हळहळ
Bhandara NewsSaam Tv
Published On
Summary
  • भंडारा जिल्ह्यातील सुंदरटोला येथे तरुणाचा मृत्यू

  • दीर्घकालीन आजार आणि नैराश्यामुळे टोकाचा निर्णय

  • गोबरवाही पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला

  • कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

शुभम देशमुख, भंडारा

तरुणाईमध्ये नैराश्येचं प्रमाण, तसेच अगदी छोट्या कारणांवरून लगेच टोकाचे निर्णय घेणे यासारख्या समस्या वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना भंडारामध्ये घडली आहे. एका तरुणाने आजारपणाला कंटाळून आपल्या जीवनाचा दोर कापला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुंदरटोला येथे घडली आहे. मृत तरुणाचे नाव महेंद्र इनवाते असे आहे. महेंद्र हा गेल्या काही दिवसांपासून एका दीर्घकालीन आजाराने त्रस्त होता. या आजारपणामुळे तो अत्यंत नैराश्यात होता.

Shocking : आजारपणाला वैतागली, ३० वर्षाच्या तरूणाची आत्महत्या; भंडाऱ्यात हळहळ
Shocking : व्हॅलेंटाईन डे आधी रूम बुक; बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये गेली, काही वेळानं अचानक तरुणीनं बाल्कनीतून मारली उडी, नेमकं काय घडलं?

अखेर या आजाराला आणि वेदनेला कंटाळून त्याने आपले जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे सुंदरटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com