Shocking : नागपूर हादरलं! तीन वर्षाचा मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नाही, नाल्यात सापडला मृतदेह

Nagpur Crime News : नागपूरमध्ये तीन वर्षांचा मुलगा खेळायला गेला तो परत घरी आला नाही. दुसऱ्यादिवशी त्याचा मृतदेह एका नाल्यात सापडला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
Shocking : नागपूर हादरलं! तीन वर्षाचा मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नाही, नाल्यात सापडला मृतदेह
Nagpur Crime News Saam Tv
Published On
Summary
  • नागपूर येथे तीन वर्षांच्या मुलाचा नाल्यात मृतदेह आढळला

  • शुक्रवारी खेळायला गेलेला मुलगा परत आला नव्हता

  • शनिवारी शोधादरम्यान मृतदेह सापडला

  • पोलिसांकडून तपास सुरू

  • सीसीटीव्ही फुटेज समोर

नागपूरमधून धकाकदायक बातमी समोर आली आहे. शहरात एतीन वर्षाचा मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नाही. धक्कादायक म्हणजे या मुलाचा मृतदेह दुसऱ्यादिवशी नाल्यात आढळून आला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून काल रात्रीच्या सुमारास मुलाचा मृतदेह सापडला आहे. मुलाच्या मृत्यूने त्याच्या आईने हंबरडा फोडला असून त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मो. कौनेन अस मृत चिमुकल्याच नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना नागपूरमधील संघर्षनगर परिसरात घडली आहे. मो. कौनेन हा तीन वर्षाचा मुलगा शुक्रवारी सायंकाळी ५च्या सुमारास मामाच्या ६ वर्षाच्या मुलासोबत खेळण्यासाठी गेला. रात्री उशिरापर्यंत तो परतला नाही. परंतु, त्याचा मामाचा मुलगा रात्री घरी परतला. आपण कौनेन सोबत रेस खेळताना तो कुठे गेला माहीत नसल्याचे कौनेनच्या मामाच्या मुलाने कुटुंबीयांना सांगितले.

Shocking : नागपूर हादरलं! तीन वर्षाचा मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नाही, नाल्यात सापडला मृतदेह
Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं...

मुलगा घरी आला नाही म्हणून पालकांनी तपास सुरु केला. खूप शोधाशोध केल्यानंतर शनिवारी ऑटोमोटिव्ह चौकाच्या मागील संघर्षनगर मधील एका नाल्यात तीन वर्षांच्या कौनेनचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला.

Shocking : नागपूर हादरलं! तीन वर्षाचा मुलगा खेळायला गेला तो परत आलाच नाही, नाल्यात सापडला मृतदेह
Shocking : व्हॅलेंटाईन डे आधी रूम बुक; बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये गेली, काही वेळानं अचानक तरुणीनं बाल्कनीतून मारली उडी, नेमकं काय घडलं?

मृत मो. कौनेनचे वडील मो. इमरान यांचा हँडलूमचा व्यवसाय आहे. तर आईगृहिणी आहे. त्याला एका महिन्याची बहीण आहे. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com