Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं...

Navi Mumbai Crime News : नेरुळ सेक्टर २८ मध्ये भंगार व्यवसायाच्या आडोशाने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. २२ लाख रुपये किंमतीचे हिरोईन व गांजा जप्त करण्यात आले असून सात आरोपींवर गुन्हा दाखल.
Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं...
Navi Mumbai NewsSaam Tv
Published On
Summary
  • भंगार दुकानाच्या आडोशाने ड्रग्स विक्रीचा पर्दाफाश

  • नेरुळमध्ये २२ लाखांचे हिरोईन व गांजा जप्त

  • सात आरोपी अटकेत

  • पुढील तपास सुरू

विकास मिरगणे, नवी मुंबई

भंगार विक्रीच्या व्यवसायाचा आडोसा घेऊन अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका टोळीचा नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने नेरुळ रेल्वे पटरी लगत असलेल्या झोपडीवर धाड टाकून तब्बल २२ लाख रुपये किंमतीचे हिरोईन आणि गांजा जफ्त केला आहे. तसेच या तस्करीत सहभागी असलेल्या सात आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ सेक्टर २८ मधील रेल्वे पटरीजवळ राजू राठोड नावाचा इसम आपल्या नातेवाईकांच्या मदतीने भंगार विक्रीच्या नावाखाली अमली पदार्थ विकायचा. याची माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली ४ पोलीस अधिकारी आणि १५ पोलीस अंमलदारांच्या पथकाने नेरुळ सेक्टर-२८ मधील रेल्वे रुळालगतच्या संशयीत झोपडीवर धाड टाकली.

Shocking : बाहेरून दिसायचं भंगाराचं दुकान, आतमध्ये चालायचा भयंकर प्रकार; धाड पडली अन् आतील दृश्य चक्रावून टाकणारं...
Mumbai Crime : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; रेल्वे अधिकारी असल्याचं सांगून लगट केली

यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत संबंधित झोपडीत तब्बल २२ लाख रुपये किंमतीचे ४३.६ ग्रॅम हिरोईन तसेच २६ ग्रॅम गांजा आढळुन आला. पोलिसांनी सदरचा गांजा जफ्त करुन अमली पदार्थाच्या तस्करीत सहभागी असलेल्या राकेश सचिन वाघरी (१८ वय वर्षे ), राजेंद्र भीमा काळे (५५ वय वर्षे), अनिता संजय पवार (२९ वय वर्षे), राजू बाबू राठोड (२८ वय वर्षे), शिवराम लक्ष्मण पवार (३२ वय वर्षे), कमळाबाई बाबु राठोड (५५ वय वर्षे), सुमन राजू राठोड (२५ वय वर्षे) या ७ जणांना ताब्यात घेऊन असून त्यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेत असलेला मुख्य आरोपी राजू राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी नेरुळ पोलीस ठाण्यात मारहाण, चोरी आणि घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी राजू राठोड याचे भंगार दुकान अनधिकृत जागेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम तातडीने निष्कासित करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवी मुंबई महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी विशाल आणि गंगा काळे या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com