Mumbai Crime : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; रेल्वे अधिकारी असल्याचं सांगून लगट केली

Mumbai Local Train Crime News : मुंबई लोकलमध्ये रेल्वे कर्मचारी असल्याचा बनाव करून एका तरुणीची छेड काढली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांनी आरोपीला वांगणी स्टेशनवर उतरवून चोप दिला असून कल्याण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; रेल्वे अधिकारी असल्याचं सांगून लगट केली
Mumbai Local Train Crime News Saam Tv
Published On
Summary
  • मुंबई लोकलमध्ये तरुणीची छेडछाड प्रकरण

  • आरोपीने रेल्वे कर्मचारी असल्याचा खोटा दावा केला

  • प्रवाशांनी आरोपीला स्टेशनवर उतरवून मारहाण केली

  • कल्याण रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल

  • महिला सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Mumbai Khopoli Local Crime News मुंबई लोकलमध्ये हाणामारी होणं काही नवीन नाही. मात्र एका लोकलमध्ये ट्रेनमध्ये एका इसमाने रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगत आणि धमकावत एका तरुणीची छेड काढली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर घटना काल म्हणजेच १२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली असून प्रवाशांनी संबंधित इसमाला चांगलीच अद्दल घडवली. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री १०:३० च्या सुमारास खोपोली ट्रेनमधून एक तरुणी प्रवास करत होती. यादरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका अज्ञात इसमाने रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगत तरुणीच्या जवळ जात तिची छेड काढली. वांगणी रेल्वे स्थानक येताच त्या मुलीच्या आईने तसेच सहप्रवाशांनी त्या व्यक्तीला स्टेशनवर उतरवून चांगलाच चोप देण्यात आला.

Mumbai Crime : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; रेल्वे अधिकारी असल्याचं सांगून लगट केली
Political News : शिंदेसेनेच्या विजयी उमेदवाराच्या कारवर हल्ला, ठाकरेसेनेच्या जिल्हा प्रमुखासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल

संतापाची बाब म्हणजे हा सगळा प्रकार घडत असताना रेल्वे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते. गंभीर बाब म्हणजे हा इसम आपण रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून सर्वांना धमकावत होता. आता या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसात त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime : मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; रेल्वे अधिकारी असल्याचं सांगून लगट केली
HSC Exam 2025-26 News : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा, १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

दरम्यान रात्री १०:३० च्या सुमारास देखील महिला सुरक्षित नाही, मग महिलांनी प्रवास कसा करावा? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com