Prime Minister Narendra Modi unveiling the 77-foot bronze statue of Lord Ram at the historic Jeevottam Math in Goa. Saam Tv
देश विदेश

पंतप्रधान मोदींनी केले जगातील सर्वात उंच श्री राम पुतळ्याचे अनावरण, जाणून घ्या या ७७ फूट उंचीच्या पुतळ्याची खास वैशिष्ट्ये

Historic Moment In Goa: गोव्यातील श्री संस्थान गोकर्ण जिवोत्तम मठाच्या ५५० वर्षपूर्ती उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ फूट उंच जगातील सर्वात मोठ्या भगवान रामाच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले.

Omkar Sonawane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी गोव्यात श्री संस्थान गोकर्ण पर्तकाळ जिवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्तीनिमित्त श्रीरामांच्या 77 फुट उंच पुतळ्याचे अनावरण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पर्तकाळ मठ परिसर आणि आजूबाजूच्या भागात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच हेलीपॅडही उभारले होते.पर्तकाळ येथील जिवोत्तम मठाच्या 550 व्या वर्षपूर्तीनिमित्त 11 दिवस उत्सव चालणार आहे. या उत्सवात सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आणि सामाजिक कार्यक्रमांचा समावेश केला असून विविध पीठांचे मठाधीश सहभागी होणार आहेत.

या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्रीरामांची 77 फुटांची भव्य दिव्य अशी मूर्ती असून, ती पूर्णपणे ब्रॉझपासून बनवली आहे. शिवाय 10 हजार चौरस मीटर क्षेत्रफळात रामायण थीम पार्क उभारले असून यामध्ये भगवान श्रीरामांचे दर्शन घडवणारे तिकीट प्रदर्शन, प्राचीन नाणी आदी गोष्टींचे प्रदर्शन लोकांना पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दक्षिण गोव्यातील ऐतिहासिक श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम मठ येथे भगवान रामाच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले. ७७ फूट उंचीची ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी कांस्यापासून बनवली होती. अनावरण समारंभात गोव्यात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरावर पवित्र ध्वज फडकवल्यानंतर काही दिवसांतच भगवान रामाच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी श्री संस्थान गोकर्ण जिवोत्तम मठाच्या ५५० वर्षांच्या जुन्या परंपरेबद्दल सांगितले की, या संस्थेने अनेक वादळे आणि आव्हानांचा सामना केला आहे हे या सगळ्याचा खूप अभिमान वाटतो.

भगवान श्रीरामांच्या मूर्तीची वैशिष्ट काय आहे?

गोव्याच्या पोर्तुगीज प्रदेशात स्थित, काना-को-ना येथे श्री संस्थान गोकर्ण जिवोत्तम मठ आहे. या ठिकाणीच जगातील सर्वात मोठी ७७ फूट उंच असलेली भगवान श्री रामची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी तयार केली होती. ज्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीची रचना देखील केली होती. ही कांस्य मूर्ती ७७ फूट उंच आहे. त्यामुळे ती भगवान रामची आतापर्यंतची सर्वात उंच मूर्ती बनली आहे.

गोव्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री दिगंबर कामत म्हणाले की, ही नवीन मूर्ती भगवान रामाची जगातील सर्वात उंच मूर्ती असणार आहे. ज्यामुळे मठाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणखी वाढेल. मठात आयोजित आजचा कार्यक्रम हा अलिकडच्या काळात मठात आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक आहे. असे गौरवोद्गार त्यांनी कढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT