संजू सॅमसन टीम इंडियाच्या टी-२० कर्णधारपदासाठी चर्चेत.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचे मोठे भाकीत.
सूर्यकुमार यादवचा उत्तराधिकारी म्हणून संजू सॅमसनकडे पाहिले जात आहे.
टी-२० वर्ल्ड कपमधील ऐतिहासिक विजयानंतर आगामी काळात भारतीय क्रिकेट वर्तुळात संघाच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये शानदार कामगिरीने अनेकांचं मन जिंकणाऱ्या संजू सॅमसनला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनकडे सूर्यकुमार यादवचा उत्तराधिकारी म्हणून प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातंय. संजू सॅमसन टी२० संघाचा कर्णधार होईल असं भाकीत एका माजी भारतीय क्रिकेटपटूनं केलंय.
माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने टी२० संघाचा पुढील कर्णधार कोण असेल यावर भाष्य करताना हे भाकित केले आहे. बीसीसीआय भारतीय संघाच्या नेतृत्वात बदल करेल तर कोणाचे नाव पुढे येईल. तसेच सूर्यकुमार यादव समोरील आव्हानांवर प्रतिक्रिया देताना मोहम्मद कैपने संजू सॅमसन बाबत मोठं विधान केलंय.
सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप जिंकवून कपिल देव, महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. त्याने भारताला चौथे विश्वविजेतेपद मिळवून दिले आहे. मात्र ३५ वर्षीय सूर्यासाठी २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकापर्यंत तंदुरुस्ती आणि फॉर्म टिकवून ठेवणं हे मोठे आव्हान असणआर आहे. तोपर्यंत सूर्या ३७ वर्षांचा होईल, त्यामुळे बीसीसीआय दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून नेतृत्वात बदल करण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.