Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई

Big Action by ICC Against Arshdeep Singh: टीम इंडियाचा खेळाडू अर्शदीपविरोधात आयसीसीने मोठी कारवाई केली. टी-२० च्या अंतिम सामन्यादरम्यान केलेली चूक अर्शदीपला महागात पडली.
Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई
arshdeep singhtwitter
Published On

Summary -

  • अर्शदीप सिंगवर आयसीसीने मोठी कारवाई केली

  • आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली

  • टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने डॅरिल मिशेलवर रागात बॉल फेकला होता

  • आयसीसीने त्याच्या मॅच फीमधील १५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे ३ लाख रुपये कापले

टी- २० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली. ८ मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने इतिहास रचला. टी-२० च्या अंतिम सामन्यामध्ये टीम इंडियाने न्यूझिलंडच्या टीमचा दारूण पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूचे योगदान खूपच महत्वाचे ठरले. चांगली कामगिरी करून देखील टीम इडियाचा खेळाडू अर्शदीप सिंगविरोधात आयसीसीने मोठी कारवाई केली.

टीम इंडियाना चॅम्पियन बनवण्यात महत्वाची भूमिका बजावून देखील आयसीसीने अर्शदीपवर दंडात्मक कारवाई केली. आयसीसीने अर्शदीप सिंगला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्याच्या मॅच फीपैकी १५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. टी- २० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यादरम्यान अर्शदीपने न्यूझीलंडचा बॅट्समन डॅरिल मिशेलवर रागाने बॉल फेकला होता. त्यामुळे मैदानावर काही वेळासाठी गोंधळ उडाला होता. अर्शदीपने नंतर या खेळाडूची माफी देखील मागितली होती पण तरी देखील त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई
Sport Success Story: जिद्द, मेहनतीनं मिळतं यश; वाचा, स्क्वॉश खेळात फिनिक्ससारखी उंच भरारी घेणाऱ्या वसुंधरा नांगरेची कहाणी

घडलं असं की, सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा बॅट्समन डॅरिल मिशेल बॅटिंग करत होता तर टीम इंडियाचा खेळाडू अर्शदीप बॉलिंग करत होता. मिशेलने दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलमध्ये सिक्स मारले. त्यामुळे अर्षदीपला राग आला. पाचव्या बॉलवर मिशेलने जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण बॉल थेट अर्शदीपच्या हातात आला. त्यानंतर अर्शदीपने मिशेलच्या दिशेने बॉल केलला आणि तो बॉल मिशेलला लागला. अर्शदीपच्या या वागण्याने मिशेल चिडला. यावेळी अंपायर आणि कॅप्टन सूर्यकुमार यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर अर्शदीपने मिशेलची माफी मागितली.

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई
Sports legend Death : भारताच्या स्टार खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

अर्शदीपच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. टी-२० वर्ल्ड कप जिंकल्याचा टीम इंडियाने जल्लोष केला. अर्शदीपने चांगली कामगिरी करून देखील आता त्याच्यावर आसीसीने कारवाई केली. त्याची मॅच फीमधील १५ टक्के रक्कम म्हणजे ३ लाख रुपये कापण्यात आले. या दंडात्मक कारवाईसह त्याला १ डिमेरिट्स गुणही दिला गेला आहे. अर्शदीपने आयसीसीचा लेव्हल १ चा नियम मोडला.

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई
Sports legends retiring: मेस्सी, धोनी आणि...! 2026 मध्ये हे खेळाडू होणार निवृत्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com